आरोग्य

पालकांसाठी आव्हान… एडीएचडी

अटेन्शन डेफिसिट हायपर अ‍ॅक्टिव्हिटी डिसऑर्डर

अत्यंत खेळकर आणि खूप उत्साही वाटणारी आपली मुलं जेव्हा शाळेत जायला लागतात तेव्हा शाळेतून काही तक्रारी सुरू होतात. हा वर्गात एका ठिकाणी बसत नाही, शेजारच्या मुलाशी बोलत असतो किंवा सतत लक्ष विचलित होत राहते. याचा परिणाम अभ्यासावर व्हायला लागतो. शाळेतून येताना काहीतरी वस्तू शाळेतच विसरून येण्याचे प्रकार घडतात. अशाच तक्रारीनंतर खेळाच्या मैदानातून इतर मित्रांकडून येतात. हा कुठलाच खेळ पूर्ण खेळत नाही, याचा टर्न येईपर्यंत हा वाट पाहत नाही किंवा खेळाचे नियम लक्षात न राहिल्याने चुका करत राहतो. घरात ही परिस्थिती काही फार वेगळी नसते. अशा वेळी घरातली इतर भावंडं किंवा पालक वैतागतात आणि त्यांना कळत नाही नेमकं होतंय काय? हुशार आणि खेळकर मूल अचानक बेशिस्त आणि बदमाश वाटायला लागतात. तर हा प्रकार असू शकतो अटेंशन डेफिसिट हायपर अ‍ॅक्टिव्हिटी डिसॉर्डर.
हे नेमकं का होतं याचं अचूक कारण सांगता येत नसलं तरी प्रामुख्याने आनुवंशिकता, मुलांच्या मेंदूत होणारे जैव रासायनिक बदल, गरोदरपणातील गुंतागुंत किंवा वेळेआधी जन्माला येणार्‍या मुलांमध्ये हा आजार आढळून येतो. लहान मुलांमध्ये आढळणार्‍या या आजाराची लक्षणे वाढत्या वयाबरोबर कमी होत जातात, पण काही लोकांमध्ये अडल्ट ए.डी.एच.डी. बघायला मिळतो. यात मुख्यत्वे करून तीन प्रकार बघायला मिळतात.
अटेंशन डेफिसिट : म्हणजे एकाग्रचित्त होण्यामध्ये अडचण निर्माण होते. अभ्यास करणं असेल, वाचन करणं असेल किंवा एकाग्रचित्त होऊन एखादी नवीन गोष्ट शिकणे असेल यामध्ये ही मुलं मागे पडतात. समोरची व्यक्ती बोलत असताना दुसरीकडे लक्ष जाते, तसेच दिलेल्या सूचनांचे योग्य पालन होत नाही, काम अर्धवट राहून जाते. रोजच्या वापरातील वस्तू जसे शाळेचे साहित्य, चावी किंवा खेळणी सहज हरवतात.
हायपर अ‍ॅॅक्टिव्हिटी : यात मुले अतिचंचल किंवा उतावीळ असतात. एका जागी बसत नाहीत. सतत चुळबूळ करत असतात किंवा हातपाय हलवत असतात. खेळ पूर्ण खेळत नाहीत. गरजेपेक्षा जास्त व सतत बोलत असतात. विचार न करता अचानक कृती करतात.
संमिश्र प्रकार : यात वरील दोन्ही प्रकारची लक्षणे एकाच मुलामध्ये बघायला मिळतात.
प्रत्येक खेळकर, खोडकर आणि अभ्यासात मागे पडणार्‍या मुलात एडीएचडी असेलच असे नाही. याचे योग्य निदान आपण तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने करणे आवश्यक आहे. यावर कायमस्वरूपी इलाज उपलब्ध नसला, तरी औषधोपचार, बिहेवियर थेरपी आणि समुपदेशन यांच्या सहाय्याने आपण लक्षणे चांगल्याप्रकारे नियंत्रित करू शकतो.
एवढं सगळं करूनसुद्धा पालकांची भूमिका आणि घरातलं वातावरण खूप महत्त्वाची भूमिका बजावते. चला तर मग बघूयात अशा परिस्थितीमध्ये आपण पालक म्हणून काय करू शकतो.

A Challenge for Parents… ADHD

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

4 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

4 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

5 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

5 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

5 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

5 hours ago