लिपिड प्रोफाइल आणि निरोगी हृदयाचे गुपित
सध्याच्या बैठ्या आणि धावपळीच्या जीवनशैलीत हृदयविकाराचा धोका झपाट्याने वाढत आहे, ज्यामागे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे असंतुलन हे एक प्रमुख कारण आहे. रोज नियमित चालण्याची साधी सवय रक्तातील घातक घटक कमी करून आपल्या हृदयाला कशी सुरक्षित ठेवते, याचा हा सविस्तर आढावा.
लिपिड प्रोफाइल ही रक्तातील चरबीचे प्रमाण तपासणारी एक महत्त्वाची चाचणी आहे. यामध्ये प्रामुख्याने कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड, एचडीएल आणि एलडीएल या घटकांची पातळी पाहिली जाते. जेव्हा आपल्या रक्तात कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढते, तेव्हा ते रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतींवर साचू लागतात. आपले हृदय हे संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा करणारे मुख्य केंद्र आहे आणि शरीरातील सर्व प्रमुख रक्तवाहिन्या हृदयाशी जोडलेल्या असतात. रक्तात चरबीचे प्रमाण वाढल्यामुळे या रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो.
आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल कार्यरत असतात. यातील एचडीएल हे चांगले कोलेस्ट्रॉल मानले जाते, जे रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली अतिरिक्त चरबी गोळा करून यकृताकडे (लिव्हर) पाठवते आणि यकृत ती शरीराबाहेर टाकून देते. याउलट एलडीएल हे वाईट कोलेस्ट्रॉल असते, जे चरबीचे कण पुन्हा रक्तवाहिन्यांमध्ये जमा करण्यास कारणीभूत ठरते. जेव्हा शरीरात चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि वाईट कोलेस्ट्रॉल वाढते, तेव्हा रक्तवाहिन्या बंद होऊन महार्ट ब्लॉक किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. रक्तातील हे असंतुलन दूर करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्याचा आणि वाईट कोलेस्ट्रॉल व ट्रायग्लिसराइड कमी करण्याचा सर्वांत नैसर्गिक आणि प्रभावी मार्ग म्हणजे रोज चालणे. आपण टाकलेले प्रत्येक पाऊल शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी नैसर्गिकरीत्या वाढवण्यास मदत करते. नियमित चालण्यामुळे रक्तवाहिन्या मोकळ्या राहतात आणि हृदय कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरळीत कार्य करत राहते. त्यामुळे जेव्हा आणि जिथे संधी मिळेल, तेव्हा चालण्याची सवय लावणे हे दीर्घायुष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
केवळ चालण्यासोबतच दैनंदिन आहार आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल केल्यास हृदयाचे आरोग्य अधिक भक्कम राहते. यासाठी आहारातून मीठ, साखर, मैदा, अतिप्रमाणातील दुग्धजन्य पदार्थ आणि प्रक्रिया केलेले (प्रोसेस्ड) अन्नपदार्थ कमी करणे गरजेचे आहे. त्याऐवजी दररोजच्या जेवणात ताज्या भाज्या, डाळी, कडधान्ये, सुकामेवा, लाकडी घाण्याचे तेल आणि हंगामी फळांचा आवर्जून समावेश करावा.
शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक शांतताही हृदयासाठी तितकीच महत्त्वाची असते. त्यासाठी स्वतःच्या क्षमतेनुसार नियमित शारीरिक हालचाल करणे आणि आपल्या वजनावर नियंत्रण ठेवणे या तीन मूलभूत सवयी अंगीकारल्यास हृदय सदैव निरोगी राहते.
The Importance of Daily Walking
गुलाबी थंडीची चाहूल लागली की, निसर्गासोबतच मानवी शरीरातही अनेक बदल घडू लागतात. आयुर्वेदाने वर्षाची सहा…
भूमीत माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळतो, त्या भूमीचा खरा आधार तिचे संविधान असते. डॉ.…
घरबसल्या नागरिकांकडून आरोग्याची काळजी नाशिक : प्रतिनिधी शहरात थंडीचा कडाका वाढू लागल्याने सकाळी लवकर घराबाहेर…
15 डिसेंबरपर्यंत सर्व विभागांना कृती आराखडे सादर करण्याच्या सूचना नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्यातील संभाव्य…
अकरा महिन्यांत 93 गुन्हे; शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने सर्वाधिक लूट नाशिक : देवयानी सोनार तंत्रज्ञानाचा वाढता…