संपादकीय

वर्दीतील खतरनाक आणि प्रेमळ पोलीस निरीक्षक

– अशोक थोरात
खाकी वर्दी म्हटली की, अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. मात्र, सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी आपल्या संवेदनशील, अभ्यासू आणि जनतेशी आत्मीयतेने वागणार्‍या कार्यशैलीमुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे. फिर्यादींच्या समस्या समजून घेणे आणि गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करणे, हा त्यांच्या कामाचा विशेष ठसा आहे. पोलीस उपनिरीक्षक असलेल्या वडिलांमुळे लहानपणापासूनच त्यांना वर्दीचे आकर्षण होते. जळगाव व चाळीसगाव येथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी खासगी नोकरी केली; मात्र 1996 मध्ये पोलीस शिपाई म्हणून सेवेत प्रवेश केला. स्पर्धा परीक्षेत यश मिळवत 2008 मध्ये ते पोलीस उपनिरीक्षक झाले. विविध ठिकाणी सेवा बजावल्यानंतर 17 जून 2025 रोजी त्यांची सटाणा पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली. सटाण्यात रुजू झाल्यानंतर त्यांनी शेतकर्‍यांच्या विहिरीवरील वीजपंप चोरीच्या गुन्ह्यांवर विशेष मोहीम राबवली. पाच आरोपींना अटक करून 11 वीजपंप जप्त करण्यात आले. नाशिकरोड येथे कार्यरत असताना त्यांनी घरफोडीच्या मोठ्या गुन्ह्यांचा छडा लावून 88 तोळे सोने व अर्धा किलो चांदी जप्त केली. या कामगिरीबद्दल तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी त्यांचा सत्कार केला होता. तसेच वाहनचोरीविरोधी मोहिमेत 105 दुचाकी जप्त करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बेपत्ता मुला-मुलींचा शोध
अल्पवयीन आणि सज्ञान मुला-मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत होती.
पोलीस ठाण्यात तक्रार देताना पालकांच्या डोळ्यातील अश्रू आणि असहाय्यता पाहून योगेश पाटील यांनी या प्रश्नावर विशेष लक्ष केंद्रित केले. त्यांनी सायबर तपासात प्रावीण्य असलेले पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत आणि पोलीस हवालदार योगेश शेवाळे यांच्यावर जबाबदारी सोपवली. गेल्या वर्षभरात बेपत्ता झालेल्या 55 अल्पवयीन मुला-मुलींपैकी 54 जणांचा शोध घेण्यात यश आले असून, एकाचा शोध सुरू आहे. याशिवाय, 159 सज्ञान व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी 145 जणांना शोधण्यात पोलिसांना यश आले. गुजरात, सांगली, सातारा यांसारख्या दूरच्या भागांत जाऊनही या व्यक्तींचा शोध घेण्यात आला. 2026 च्या पहिल्या चार महिन्यांत बेपत्ता झालेल्या 21 जणांपैकी 14 जणांचा शोध लागला आहे.
योगेश पाटील यांच्या यशामागे कुटुंबाचा मोठा वाटा आहे. कर्तव्यदक्षता, संवेदनशीलता आणि गुन्हेगारांविरुद्ध कठोर भूमिका यांचा समतोल साधत त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला असून, ते खर्‍या अर्थाने जनतेचे विश्वासू रक्षक ठरले आहेत.

A dangerous and loving police inspector in uniform

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

6 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

7 hours ago