– मनीषा खत्री
सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे पौराणिक महत्व प्राप्त असलेल्या नाशिकचा कायापालट येत्या काही दिवसांत होणार आहे. विशेषत: आगामी सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने त्यादृष्टीने राज्य शासनाच्या मदतीने शहरात पायाभूत विकासकामे सुरु असून सिंहस्थाच्या माध्यमातून शहर विकासाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. नवीन पूल, सिव्हरेज प्रकल्प, रस्ते विकास, साधू ग्राम उभारणी आणि स्मार्ट सिटी आदी घटकांचा यात समावेश आहे. गोदाकाठच्या सुशोभीकरणासह नवीन पुलांची उभारणी आणि शहरातील 28 रस्त्यांची उभारणीमुळे येत्या काही दिवसांत नाशिक आपल्याला पूर्णपणे बदललेले दिसेल. हा बदल शहर विकासाच्या दुष्टीने वेगळ्या उंचीवर नेणारा असेल. सिंहस्थात भाविक पवित्र अशा अमृत पर्वणीत न्हाऊन निघणार आहे. तर दुसरीकडे सिंहस्थ कामातून शहर विकासाचा कुंभ उभारला जाणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्ताने प्राधिकरण मार्फत शहरातील महत्वाच्या रस्त्यांचा विकास होत आहेत. सदर रस्त्ता कामांंमुळे पुढील पंचवीस ते तीस वर्षाचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्ते विकासालाही प्राधान्य देण्यात आले आहे. गंगापूर रोड, त्र्यंबक रोड, पंचवटी ते तपोवन मार्ग तसेच नाशिक रोड परिसरातील प्रमुख मार्गांचा कायापालट केला जात आहे. शहरात तब्बल 31 प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण, काँक्रीटीकरण आणि मजबुतीकरण सुरू असून, रस्त्यांची रुंदी 30 ते 60 मीटरपर्यंत असणार आहे. यामध्ये फुटपाथ, डिव्हायडर आणि ड्रेनेज यंत्रणा उभारली जात असून, वन टाइम डिगिंग धोरणाचा अवलंब केला जात आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे सुमारे 1500 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, अनेक रस्त्यांवर काम प्रगतिपथावर आहे. सिंहस्थाच्या दुष्टीने सर्वात महत्वाचा परिसर म्हणून संपूर्ण पंचवटीचा परिसर येतो. त्यामुळेच सिंहस्थात पंचवटी आणि तपोवन परिसरात साधू ग्राम विकसित करण्यात येत आहेत. रामकालपथमुळे रामकुंड ते काळाराम मंदिर, सीता गुफा पर्यत अध्यात्मिक दुष्ट्या या परिसराचे काम करण्यात आले आहे. दीडशे कोटी खर्चून हा महत्वाचा प्रकल्प अंतिम टप्यात असून सिंहस्थापूर्वी तो भाविकांसाठी खुला झालेला असेल. रामायणातील थीम घेऊन रामकाल पथ साकारण्यात आला आहे. दरम्यान शहरात स्ते, पाणी पुरवठा, वीज, ड्रेनेज, शौचालये, फायबर नेटवर्क, अशा सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याशिवाय मुकणे पाणी पुरवठा योजनेतून थेट विल्होळी ते साधुग्राम पर्यत उर्ध्व गुरुत्ववाहिनीद्वारे पाणी आणले जात आहे. साधुग्राममध्ये याद्वारे चोवीस तास पाणी पुरवठा केला जाणार आहे. सदर काम सुरु असून नियोजित वेळेत ते पूर्ण होइल. साधुग्रामसह शहरात येणार्या भाविकांसाठी आरोग्याच्या कुठल्याही समस्या उदभवू नये. याकरिता तपोवन मध्ये शंभर खाटांचे रुग्णालयाची व्यवस्था केली जाणार असून गर्दीच्या ठिकाणी फिरते रुग्णालयाची सोय असेल. साधुग्रामचा विस्तार मोठया प्रमाणात असल्याने लाखो साधू-संत आणि भाविकांच्या निवासासाठी संपूर्ण मुलभूत सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. शहरात सुरु असलेली कामे केवळ सिंहस्थापुरती मर्यादित नसून तर ती पुढील अनेक वर्षांच्या विकासाचा पाया भरणारी आहेत. याद्वरे स्वच्छ आणि सुरक्षित गोदावरी, सुधारलेली वाहतूक व्यवस्था, अखंडित पाणीपुरवठा, तीर्थाटन आणि रोजगार वाढ भविष्यातील नाशिकसाठी देणगी ठरणार आहे. नाशिक महानगरपालिकेने मुकणे पाणी पुरवठा व सांडपाणीसारख्या मोठ्या प्रकल्पांसाठी पारंपरिक शासकीय निधीवर अवलंबून न राहता बाजारातून महापालिका रोख्यांच्या माध्यमातून निधी उभारण्याचा अभिनव निर्णय घेतला आहे. या उपक्रमामुळे महापालिकेला तत्काळ 46 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, यासोबतच अर्बन चॅलेंज फंड (यूसीएफ) अंतर्गत 200 ते 250 कोटी रुपयांपर्यंत अतिरिक्त निधी मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. या पद्धतीमुळे महापालिकेच्या आर्थिक व्यवहारात शिस्त येण्यास मदत होत आहेत. तसेच वित्तीय पारदर्शकता वाढण्यास हातभार लागणार आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारे महापालिका रोख्यांद्वारे निधी उभारून प्रोत्साहन निधी मिळवणारी नाशिक महाराष्ट्रातील पहिलीच महानगरपालिका आहे. मुकणे आधारित जल प्रकल्प आणि पाणी गळती कमी करण्याचा आराखडा मुकणे धरणावर आधारित जलशुद्धीकरण प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठा व्यवस्थेत मोठे बदल घडवून आणले जात आहेत. या प्रकल्पाचा भाग म्हणून करण्यात आलेल्या पाणी लेखा परीक्षणात सध्या शहरातील पाणीगळती (नॉन-रेव्हेन्यू वॉटर) सुमारे 47 टक्के असल्याचे समोर आले आहे. हे नुकसान कमी करण्यासाठी अमृत योजनेंतर्गत पाणी वितरण पाइपलाइनचे आधुनिकीकरण सुरू असून, गंगापूर धरणातून येणार्या मुख्य पाइपलाइनची बदलीही करण्यात येत आहे. ही प्रणाली मुकणे धरणाशी जोडली जात आहे. शहरातील जीर्ण जलवाहिन्या पूर्णपणे बदलल्या जात असल्याने पाणी गळ्ती थांबवता येणार आहे. याशिवाय 24 तास पाणी पुरवठा योजना राबवण्यासाठी जागतिक बँकेकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या सर्व उपाययोजना यशस्वी झाल्यास पाणी गळती 47 टक्क्यांवरून घटून ती दहा टक्क्यांपर्यंत येण्याची शक्यता आहे. सिंहस्थत सर्वाधिक गर्दी रामकुंड, पंचवटी आणि तपोवन परिसरातच होताना दिसते. याकरिता प्रशासनाने कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी नवीन पूलांचे काम हाती घेतले आहेत. रामकुंड परिसरात आधुनिक पादचारी पूल उभारला जात असून, यामुळे घाटांदरम्यान भाविकांची हालचाल अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. तसेच गोदावरी नदीवरील इतर ठिकाणीही पूल उभारून पंचवटी ते तपोवन या पट्ट्यातील संपर्क वाढविण्यात येत आहे. विशेषतः घाट परिसरातील गर्दी लक्षात घेऊन गोदावरी नदी आणि उपनद्यांवर नवीन पूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रामकुंड परिसरात पादचारी पूल उभारला जात असून, यामुळे भाविकांची सुरक्षित हालचाल सुलभ होणार आहे. तसेच पंचवटी ते तपोवन या पट्ट्यातील संपर्क सुधारण्यासाठी पूल उभारणी सुरू आहे. तपोवन परिसरात सिव्हरेज प्रकल्पाजवळ सेवा व आपत्कालीन वाहतुकीसाठी पूल उभारण्यात येत असून, नंदिनी नदी आणि वालदेवी नदी यांवरही नवीन पूल उभारले जात आहेत. एकूण पाच ते सात पूल प्रकल्प विविध टप्प्यांत राबवले जात असून, त्यासाठी सुमारे 250 ते 400 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी-एचएएम) मॉडेल अंतर्गत राबवण्यात येत असून, या प्रकल्पात एक शहर, एक संचालक ही संकल्पना प्रभावीपणे लागू केली जात आहे.
शहर विकासाची ‘पर्वणी’
शहरातील सांडपाणी व्यवस्था एकाच संचालकाकडून चालवली जाणार असल्याने संचालन खर्चात बचत होण्याची अपेक्षा आहे. प्रकल्पात वीज वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी वीज वापर हमी देण्यात आली आहे, ज्यामुळे वीज खर्च मर्यादेत राहणार आहे. तसेच या प्रकल्पात कडक कार्य प्रदर्शन अटी ठेवण्यात आल्या असून, संचालकाने सांडपाण्याची गुणवत्ता निर्धारित निकषांनुसार राखली नाही. विशेषतः बीओडी आणि सीओडी पातळी 5 पेक्षा कमी ठेवली नाही, तर त्यांचे देयक रोखण्यात येणार आहे. एकूण देयकातील 30 टक्के हिस्सा कार्य प्रदर्शनावर आधारित असल्यामुळे जबाबदारी आणि कार्यक्षमता दोन्ही वाढणार आहेत. सांडपाणी प्रकल्पामुळे गोदावरी प्रदुषण मुक्त होणार आहे. गेल्या कित्येक वर्षापासून गोदावरी प्रदुषनाचा मुद्दा गाजत आहे. मात्र या प्रकल्पामुळे गोदावरीचा प्रवाह पुन्हा स्वच्छ प्रवाहात वाहताना दिसेल. 25 वर्षांच्या दीर्घकालीन दृष्टिकोनातून तयार करण्यात आलेला हा प्रकल्प महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर राबविला जात आहे. दरम्यान येत्या काही दिवसांत शहराचा होणारा कायापालट पाहता शहराची ओळ्ख सिंहस्थ नगरी बरोबरच विकासाची नगरी अशी नक्कीच होइल. महत्वाचे म्हणजे रस्ते कामांमुळे मागील काही दिवसांत नागरिकांना झालेला त्रास लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यादुष्टीने उपाययोजना केल्या जात असून संबंधित यंत्रणांना तशा सूचना केल्या आहेत. दरम्यान होऊ घातलेला सिहस्थ कुंभमेळा भव्य दिव्य स्वरुपात करावयाचा असल्याने शहरातील सुरु असलेली कामे नियोजित वेळेतच पूर्ण करण्याचा मानस असेल.
A Golden Opportunity for City Development
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…