अंधश्रद्धेच्या वस्तूंमुळे भीतीचे वातावरण
सुरगाणा : प्रतिनिधी
तालुक्यातील पिंपळसोंड येथील स्मशानभूमीत अज्ञाताकडून करणीचा किळसवाणा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्मशानात खड्ड्यात रेड्यावर स्वार झालेली यमराजाची मूर्ती आणि इतर अघोरी वस्तू आढळून आल्या आहेत.
खुंटविहीरचे पोलीसपाटील यादव झिरवाळ आणि पिंपळसोंडचे सेवानिवृत्त पोलीसपाटील रतन खोटरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10-12 दिवसांपूर्वी पिंपळसोंड येथे एका व्यक्तीचे निधन झाले होते. अंत्यसंस्कारानंतरच्या कर धरण्याच्या रात्री एका अज्ञात भोंदूबाबाने स्मशानभूमीत दीड ते दोन फूट खोल खड्डा करून हा तांत्रिक विधी केला. या खड्ड्यात चिकन मातीची रंगवलेली यमराजाची मूर्ती, सहा मातीचे पुतळे, पुतळ्यांच्या तोंडाला कच्च्या दोर्याने बांधलेले स्त्री-पुरुषांचे पासपोर्ट आकाराचे फोटो, कोंबडा आणि देशी मद्य अशा अंधश्रद्धेच्या वस्तू आढळून आल्या. या अघोरी प्रकारामुळे गावात भीती पसरली असली, तरी ग्रामस्थांनी अंधश्रद्धेला बळी न पडता एकत्र येत सामुदायिक लढा उभारण्याचा संकल्प केला आहे. नागरिकांनी त्या सर्व तांत्रिक वस्तू जमिनीतून खोदून काढल्या आणि गावकुसाबाहेर नेऊन त्यांचे दहन केले. या किळसवाण्या प्रकाराबाबत परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
A horrific form of witchcraft in a graveyard in Pimplesond
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…