नाशिक

पोलीस ठाण्यात कथित गोळीबाराची चर्चा

पोलीस आयुक्तांंकडून चौकशीचे आदेश

नाशिक : प्रतिनिधी
शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील एका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाने शासकीय पिस्तुलातून गोळी झाडल्याची चर्चा रंगू लागल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावरही विविध पोस्ट आणि प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत. मात्र, या घटनेची कोणतीही अधिकृत नोंद उपलब्ध नसल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पोलीस निरीक्षकाने पोलीस ठाण्याच्या परिसरात शासकीय पिस्तुलातून गोळी झाडल्याची चर्चा नवीन नाशिक आणि सिडको परिसरात दिवसभर सुरू होती. गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला, त्यावेळी पोलीस ठाण्यात कोण उपस्थित होते, तसेच या प्रकारात कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाले का, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
सामान्य नागरिकांना कायद्याचे धडे देणारे अधिकारीच नियमांचे उल्लंघन करत असतील तर ही गंभीर बाब आहे. पोलीस ठाण्यात गोळीबार झाल्याची चर्चा होत असताना अधिकृत माहिती समोर येत नाही, हे धक्कादायक आहे, असे दानवे यांनी म्हटले आहे. संबंधित अधिकार्‍याला वाचवण्यासाठी प्रकरण दडपले जात आहे का, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

सीसीटीव्ही फुटेज तपासणार
दरम्यान, नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रकरणाची दखल घेत स्पष्टीकरण दिले आहे. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असून, फुटेज केंद्रीय स्तरावर सुरक्षितरीत्या जतन केले जाते आणि ते नष्ट करता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले. हे प्रकरण संवेदनशील स्वरूपाचे असल्याने सर्व पोलीस ठाण्यांतील सीसीटीव्ही फुटेज तपासून सखोल चौकशी करण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास विभागीय कारवाईही केली जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

दानवे, आव्हाडांची टीका
डेली डायरीमध्ये उल्लेख आहे का?, सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमके काय दिसते? असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणावरून राज्य सरकार आणि गृह विभागावर टीका केली आहे.

Discussion of alleged shooting at police station

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

6 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

6 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

6 hours ago