– गोरख काळे
महापालिकेत लोकप्रतिनिधींची सत्ता येऊन जवळपास नऊ महिने होत आहेत; परंतु आजही नगरसेवकांना प्रभागातील मूलभूत सुविधांसाठी प्रशासनाशी झगडावे लागत आहे. एकीकडे आपण शहराचे वर्णन मंत्रभूमी ते यंत्रभूमी असे करत असताना दुसर्या बाजूला मात्र शहरातील विविध भागांत पिण्याच्या पाण्याच्या समस्येसह ड्रेनेज, स्वच्छता व मोकाट कुत्रे यावरच महासभा, स्थायी समिती व प्रभाग सभेत तासन् तास नगरसेवक बोलत आहेत. महासभेत विकासकामांवर चर्चा अपेक्षित असताना येथे मूलभूत सुविधांंचीच वानवा असल्याने प्रथमदृष्ट्या हा प्रश्न मार्गी लावण्याचे दिव्य सदस्यांना करावे लागत आहे. यावरून मात्र शहरात नेमकं चाललंय काय, असा सवाल सर्वसामान्यांना पडला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात हजारो कोटींची कामे सुरू आहेत. पण मूलभूत सुविधांची वानवा असल्याने असे विरोधाभासी चित्र शहरात दिसत आहे. परिणामी नागरिक प्रशासनाच्या कार्यतत्परतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले आहेत. प्रशासनावरील विश्वास दृढ करायचा असेल तर प्रथमतः नागरिकांच्या दैनंदिन समस्यांना प्राधान्य देऊन त्या सोडविण्याची तत्परता प्रशासनाला दाखवावी लागेल.
महापालिकेत लोकप्रतिनिधींची सत्ता आली तेव्हापासून ते आतापर्यंत झालेल्या महासभा व स्थायी समितीचा मागोवा घेतला तर लक्षात येते की, प्रत्येक सभेत झालेली चर्चा विकासकामे नव्हे, तर पुरेसे पाणी, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता, मोकाट कुत्रे हे मुद्दे उपस्थित करत नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारलाय. ड्रेनेज विभागात मनुष्यबळाचे कारण देऊन सोयीस्करपणे वेळ मारून नेली जात आहे. सहाही विभागांतील बर्याच भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जटिल बनला आहे. कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा नित्याचाच झाल्याने यावरून एक विभाग दुसर्या विभागाविरोधात उभा राहिला आहे. जसे- काही दिवसांपूर्वी पंचवटीतल्या नगरसेवकांनी पूर्व विभागातील पाणीपुरवठा बंद केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतरही शहरातील सर्वच भागांतून पाण्याबाबत तक्रारींचा ओघ आहे. जलवाहिनी पंचवीस ते तीस वर्षे जुनी झाल्याने ती जीर्ण झाली असून, ती नव्याने टाकली जात आहे, असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगितले जात आहे. दरम्यान, गुरुवारी (दि. 10) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी ड्रेनेज, मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावरूनच प्रशासनाला लक्ष्य केले. शहराची व्याप्ती वाढत चालल्याने गावठाण परिसर विकसित झाला आहे. यासोबतच मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. महापालिकेकडून मोकाट कुत्र्यांचे निबीर्र्जीकरण केले जात असले, तरी कुत्र्यांची संख्या नियंत्रणात का नाही, असा सवाल सदस्य सतत करत आहेत. सध्या विल्होळी येथे निबीर्र्जीकरण केंद्र असून, त्याची संख्या वाढविण्याची मागणी सदस्यांनी केली आहे. एकीकडे मूलभूत सुविधांसाठी नगरसेवक भांडत असताना उद्या (सोमवारी) श्रीगणरायाचे आगमन होत आहे. तत्पूर्वी, गणेश मंडळांनी गणरायाच्या मिरवणूक मार्गावरील असुविधांवरून महापालिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यत्वे मिरवणूक मार्गावर खड्डेच खड्डे असल्याने मिरवणूक जाणार कशी? हजारो गणेशभक्तांची गैरसोय दूर कशी करणार, असा प्रश्न ठिकठिकाणी झालेल्या बैठकीत मंडळांनी महापालिका प्रशासनाला केला. महापौर हिमगौरी आहेर-आडके व मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी मिरवणुकीत कुठेही अडथळे येणार नाहीत. बांधकाम विभागाला खड्डेमुक्त रस्ते करण्याचे निर्देश दिल्याचे आश्वासन देण्यात आलेे. गणेशोत्सव काळात प्रशासनाने एमएनजीएल महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडला रस्ते खोदण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मंडळांसह नागरिकांच्या हिताचा निर्णय प्रशासनाने घेतलाय. गणेशोत्सवात नागरिकांना त्रास नको म्हणून आयुक्तांनी भूमिका घेतली आहे.
दहा ते बारा दिवस गणेशोत्सवाची धूम असेल. या काळात नागरिक त्यांना भेडसावणार्या समस्यांकडे दुर्लक्ष करतील. मात्र, त्यानंतर प्रशासनाला नागरिक व नगरसेवकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. त्याकरिता प्रशासनाला या समस्या मार्गी लावण्याशिवाय पर्यायच नाही. विशेषत: रस्ते, पाणी व ड्रेनेज या तीन विभागांबाबत नागरिकांच्या तीव्र भावना आहेत. शहरात सिंहस्थाचे 28 रस्तेकाम सुरू असले, तरी इतर गोष्टींकडे प्रशासनाला लक्ष द्यावे लागेल. जोपर्यंत मूलभूत समस्या कायमच्या संपुष्टात आणल्या जात नाहीत तोवर विकासकामांचा मार्ग सुकर होणार नाही.
A lack of even basic amenities!
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…