कल्याण पोलिसांचा सिन्नरमध्ये थरारक सापळा
कल्याण/ नाशिक : ‘कामाला चाललोय’ हे सांगत घराबाहेर पडणारा ललित देवरे खरोखर काम करत होता; पण ते काम म्हणजे दुसर्यांच्या दुचाकी चोरण्याचे! कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये धाव घेत शुक्रवारी या 33 वर्षीय मिस्त्री-चोराला अखेर रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याने जळगावमध्येही चोरीच्या दुचाकी विकल्या आहेत.
मूळचा सिन्नर परिसरातील रहिवासी असलेला ललित देवरे व्यवसायाने मिस्त्री. दिवसभर हातोडा-पाना घेऊन कामावर जाण्याचे सोंग घ्यायचा आणि रात्री कल्याण परिसरात दुचाकी चोरीचा उद्योग करायचा. नशेच्या व्यसनाने त्याला या वाटेला लावले. मिस्त्रीच्या रोजंदारीत व्यसन भागेना, म्हणून दुसर्यांच्या दुचाकी चोरून विकणे हा शॉर्टकट त्याने निवडला. चोरलेली एक बाइक त्याने चक्क जळगावला नेऊन विकली होती, म्हणजे हा केवळ स्थानिक नव्हे, तर आंतरजिल्हा गुन्हेगार बनला होता.
कल्याण परिसरात दुचाकी चोरीच्या घटना वाढू लागल्या तेव्हा पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम सुरू झाली.
महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण परदेशी आणि पोलीस अधिकारी विकास मडके यांच्या पथकाने तांत्रिक पुरावे आणि मोबाइल ट्रॅकिंगच्या आधारे संशयिताचा माग काढला. धागा नाशिक जिल्ह्यातील सिन्नरपर्यंत पोहोचला आणि पोलिसांनी थेट सिन्नरमध्ये धाव घेत ललितला त्याच्याच घरातून उचलले.
ललित देवरेची कसून चौकशी सुरू असून, जळगाव आणि इतर ठिकाणी त्याने आणखी किती चोर्या केल्या, हे तपासात उघड होत आहे. या घटनेने पुन्हा एकदा एक कटू वास्तव अधोरेखित केले आहे. नशेचे व्यसन माणसाला केवळ गर्तेत नाही, तर थेट गुन्हेगारीच्या खाईत लोटते. सिन्नर-नाशिकसारख्या भागातील तरुणांमधील वाढते व्यसनाधीनतेचे प्रमाण आणि त्यातून निर्माण होणारी गुन्हेगारी, हा प्रश्न समाज व प्रशासन दोघांनाही गांभीर्याने घ्यावा लागणार आहे.
पत्नीला नवर्याच्या प्रतापाचा पत्ताच नाही!
या प्रकरणाला सर्वांत नाट्यमय वळण मिळाले, ते पोलिसांनी घरावर धाड टाकली तेव्हा ललितची पत्नी घरीच होती. “हे मिस्त्रीकाम करतात“ असा तिचा ठाम समज होता, पण पोलिसांनी जेव्हा वास्तव सांगितले तेव्हा ती सुन्न झाली. आपल्या नवर्याचा खरा चेहरा असा असेल, याची तिला सुतराम कल्पना नव्हती. सिन्नर परिसरात तो चांगला माणूस म्हणून ओळखला जात होता, हे सत्य उघड होणे तितकेच धक्कादायक होते.
A mason by day, a thief by night!
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…