नाशिक

मंदिरासाठी बड्या व्यक्तींकडून देणग्यांचा ‘प्रसाद’

अंकशास्त्राच्या आधारे उभारलेले मिरगावचे ‘ईशान्येश्वर’ मंदिर चर्चेत

नाशिक : प्रतिनिधी
स्वयंघोषित कॅप्टन अशोककुमार खरात यांनी सुमारे 17 वर्षांपूर्वी अंकशास्त्राच्या आधारे सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे जाम नदीच्या ईशान्य कोपर्‍यात ‘ईशान्येश्वर’ मंदिराची उभारणी केली होती. या मंदिरासाठी नेवासा येथून घडीव दगड आणण्यात आले होते. सन 2009-10 च्या सुमारास मंदिराच्या उभारणीसाठी सुमारे 50 लाख रुपये खर्च झाल्याची चर्चा होती. त्या वेळीही हे मंदिर स्वखर्चातून उभारल्याचा दावा खरात यांनी केला होता; मात्र प्रत्यक्षात विविध राजकारणी, उद्योजक आणि सेलिब्रिटींकडून देणग्या गोळा केल्याची चर्चा स्थानिक पातळीवर होत होती.

मंदिराच्या व्यवस्थापनासाठी ‘श्री शिवनिका संस्थान, मिरगाव’ या नावाने ट्रस्ट स्थापन करण्यात आला. या ट्रस्टवर राज्यातील काही नामांकित व्यक्तींनाही स्थान देण्यात आले होते. मंदिर उभारल्यानंतर शिर्डीकडे जाणार्‍या भाविकांनी सिन्नर-शिर्डी मार्गावरील या मंदिरात दर्शनासाठी येण्यास सुरुवात केली. राजकारणी, उद्योजक आणि कलाकारांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर येथे पूजाअर्चेसाठी येऊ लागल्याने हे मंदिर काही वर्षांतच चर्चेत आले.
मंदिराच्या उभारणीवेळी कळसाची उंची, गाभार्‍याचा आकार, पायर्‍यांची संख्या, मुख्य दरवाजा, नंदी, दगड आणि पिंड यांसह सर्व बाबी अंकशास्त्रानुसार निश्चित केल्याचा दावा करण्यात आला होता. देश-विदेशातील शिष्य येथे पूजेसाठी येत असल्याची माहितीही पुढे आली होती.
13 ऑगस्ट 2009 रोजी ‘श्री शिवनिका संस्थान, मिरगाव’ या नावाने ट्रस्टची अधिकृत नोंदणी करण्यात आली. या ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून अशोककुमार खरात कार्यरत होते. संस्थेच्या माध्यमातून विविध धार्मिक व समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले जात होते. राज्याच्या पर्यटन विभागासह इतर निधीच्या माध्यमातून मंदिराकडे जाण्यासाठी काँक्रीट रस्ता तयार करण्यात आला. तसेच मंदिराजवळ सुमारे पाच हजार चौरस फुटांचा सभामंडपही उभारण्यात
आला आहे.
राज्यातील अनेक जुन्या मंदिरांना पर्यटनाचा निधी मिळणे कठीण असताना खरात यांचे राजकीय वर्तुळात प्रभाव असल्यामुळे मंदिराच्या विकासासाठी सहज निधी उपलब्ध होत असल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे, ज्या मिरगावमध्ये हे मंदिर उभारले गेले आहे, त्या गावात अद्याप राज्य परिवहनची बस पोहोचलेली नाही. गावात मूलभूत विकासाच्या सुविधा मर्यादित असताना मंदिर परिसरात मात्र मोठ्या प्रमाणावर विकास झाल्याचे चित्र दिसून येते. मंदिरासमोर शिवनिका ट्रस्टच्या माध्यमातून सुमारे पाच एकर जागाही खरेदी करण्यात आली आहे. या जागेवर दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते.

दोन वर्षांपूर्वी ट्रस्टमध्ये बदल

शिवनिका ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर काही स्थानिक प्रतिष्ठित व्यक्ती संचालक म्हणून कार्यरत होत्या. मात्र, दोन वर्षांपूर्वी तीन ट्रस्टींनी राजीनामे दिल्यानंतर विविध चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर काही जुने सदस्य कायम ठेवून ट्रस्टची नव्याने रचना करण्यात आली. या नव्या ट्रस्टमध्ये खरात यांच्या पत्नी यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली होती.

मिरगाव शिवारात आलिशान बंगला

ईशान्येश्वर मंदिराच्या मागील बाजूस खरात यांचा आलिशान बंगला आणि शेती असल्याचे सांगितले जाते. परिसरात आंब्याची बाग असून, समोर मोठा सभामंडप उभारण्यात आला आहे. दुबईस्थित एका भारतीय भक्ताने कोट्यवधी रुपये देऊन ही हवेली उभारून दिल्याचीही चर्चा परिसरात आहे.

‘Prasad’ of donations from big personalities for the temple

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

4 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

4 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

5 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

5 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

5 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

5 hours ago