त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
श्रावणातील दुसर्या सोमवारच्या पर्वकाळाचे औचित्य साधून त्र्यंबकनगरीत शिवभक्तांचा महापूर लोटला होता. रविवारी सायंकाळपासूनच कुशावर्त तीर्थावर भाविकांची गर्दी दिसून येत होती. मध्यरात्री बारानंतर ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी निघणार्या भाविकांची संख्या लक्षणीय होती. संपूर्ण शहरात ’बम बम भोले’ आणि ’हर हर महादेव’चा गजर घुमत होता.
दिवसभर कुशावर्त तीर्थावर पवित्र स्नानासाठी भाविकांची वर्दळ सुरू होती. त्र्यंबकेश्वर मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रशासनाकडून सर्व प्रकारचे सशुल्क दर्शन बंद ठेवण्यात आल्याने भाविकांनी पूर्व दरवाजा दर्शनबारीतून शिस्तबद्ध दर्शन घेतले. नेहमी गर्दीचे केंद्र ठरणारा उत्तर दरवाजा परिसर मोकळा राहावा, यासाठी पोलिसांनी रस्त्याच्या मध्यभागी बॅरिकेडिंग उभारले होते. यामुळे तेथील वाहतूक व पादचार्यांची कोंडी टळली असून प्रदक्षिणेसाठी जाणार्या-येणार्या भाविकांना याचा मोठा दिलासा मिळाला. शहरात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी 3 वाजेच्या सुमारास भगवान त्र्यंबकेश्वराची सोमवारची पारंपरिक पालखी निघाली. कुशावर्त तीर्थावरून मंगलवाद्यांच्या गजरात निघालेल्या या पालखीच्या दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी अलोट गर्दी केली होती.
A multitude of Shiva devotees gather at Trimbak on the second Monday of Shravan.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…