नाशिक

त्र्यंबकनगरीत शिवभक्तांचा लोटला जनसागर

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
पवित्र श्रावण महिन्याच्या तिसर्‍या सोमवारी (दि. 31 ऑगस्ट) त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी शिवभक्तांचा अलोट जनसागर लोटला होता. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर यावर्षी श्रावणात अधिक गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. रविवारी (दि. 30) दुपारपासून सुरू झालेला भक्तांचा ओघ सोमवार दुपारपर्यंत अविरत सुरू होता. प्रदक्षिणा मार्गावर सलग 24 तासांपेक्षा अधिक वेळ गर्दीचा अनुभव आला.
त्र्यंबकेश्वर शहरासह प्रदक्षिणा मार्गावर ’हर हर महादेव’ आणि ’बम बम भोले’चा जयघोष अहोरात्र घुमत होता. वारकर्‍यांनी टाळ-मृदंगाच्या तालावर हरिनामाचा गजर करत, तर तरुणाईने ढोल आणि बिगुल वाजवत प्रदक्षिणा पूर्ण केली. प्रदक्षिणा मार्गावर व शहरात ठिकठिकाणी भाविकांसाठी फळे, फराळ व उपवासाच्या खिचडीचे वाटप करण्यात येत होते.
कुंभमेळा पर्वणीची रंगीत तालीम म्हणून प्रशासनाने गर्दी नियंत्रणासाठी विशेष नियोजन केले होते. तेली गल्लीत जागोजागी भाविकांना अडवून 200 ते 300 च्या टप्प्याटप्प्याने कुशावर्त घाटाकडे सोडले जात होते. एका मिनिटाला सरासरी 100 भाविक मार्गस्थ होत होते. हा ओघ सलग 15 तास कायम होता. सोमवार दुपारपर्यंत सुमारे दीड ते दोन लाख भाविकांनी प्रदक्षिणा पूर्ण करून परतीचा मार्ग धरला होता. ब्रह्मगिरी पर्वत आणि गंगाद्वार परिसरातही भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मुख्य मंदिरात मात्र नेहमीच्या तुलनेत दर्शनासाठी सुटसुटीत वातावरण होते.

त्र्यंबकराजाची पालखी अन् आकर्षक शृंगार
सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास भगवान त्र्यंबकराजाची पालखी कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी आली, तेव्हा भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. दुपारी साडेचारला पालखी मंदिरात परतल्यानंतर नित्य प्रदोष पुष्प पूजक डॉ. ओमकार आराधी यांनी देवाची आकर्षक शृंगार पूजा बांधली. यावेळी गर्भगृहात सुरेश आराधी, पुजारी सुशांत तुंगार, राज तुंगार, संतोष तुंगार उपस्थित होते. पालखी सोहळ्यास देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विवेक सोनुने, विश्वस्त कैलास घुले, रूपाली भुतडा, पुरुषोत्तम कडलग, प्रदीप तुंगार यांच्यासह मान्यवर व भाविक उपस्थित होते. सोमवारी सकाळी त्र्यंबकेश्वर मंदिरात देवस्थान ट्रस्टच्या वतीने विश्वकल्याणार्थ विश्वस्तांच्या हस्ते लघुरूद्र पूजा झाली.

A sea of ​​Shiva devotees surged into the holy city of Trimbak.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

6 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

7 hours ago