नाशिक

स्क्रीनवर झळकते एकच कथा, खरातबाबा चर्चेच्या नवनव्या व्यथा

सोशल मीडियावर खरातबाबा ट्रेंडिंगला

नाशिक ः प्रतिनिधी
गेल्या चार दिवसांपासून नाशिकसह राज्यात भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर खरातबाबा टे्रेंडिंगला असून, टीव्ही, मोबाईल, सोशल मीडियासाठी स्क्रीन उघडला की खरातचे नवनवे कारनामे आणि पीडितांंच्या नवनव्या व्यथा ऐकायला/पाहायला मिळत आहेत. त्यामुळे खरातच्या भोंदूगिरीत कोणकोण अडकले, किती कोटींची मालमत्ता, किती पीडिता, अजून नवे काय कारनामे ऐकायला येऊ शकतात, याची उत्सुकता नेटकर्‍यांमध्ये आहे. सध्या सोशल मीडिया खरातबाबाने कॅच केलेला दिसून येत आहे.
कॅप्टन अशोक खरात याला दि. 18 मार्चला अटक करण्यात आली होती. अतिशय नाट्यमय पद्धतीने खरातला अटक करण्यात आली होती. महिलांचे लैैंगिक शोषण, गुंगीचे औषध देत महिलांना संमोहित करून अत्याचार तसेच गर्भवतीवरही अत्याचार आदी गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. त्याची एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. खरातचे पाय खोलात असून, त्याच्यावर तीन गुन्ह्यांंची नोंद झाली आहे. या भोंदू कॅप्टनबाबत दररोज नवनवे खुलासे होत आहेत. त्यानिमित्ताने ईशान्येश्वर मंदिर चर्चेत आले. देवस्थानासाठी पाण्याचे आरक्षण, त्याची संपत्ती, बंगला, बाबाची जीवनशैली, परदेशातील त्याचे लक्झरी जीवनमान, त्याचे हायप्रोफाइल लोकांशी संबंध आदी सर्वच बाबाच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नेटकरी व्हायरल व्हिडिओवर व्यक्त होताना दिसत आहेत. या प्रकरणात एआयचा वापर करूनही अनेकांनी फोटो व्हायरल केले आहेत. त्यावर नेटकर्‍यांच्या कधी संतापजनक, तर कधी फनी कमेंट केल्या जात आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून या सर्व प्रकारात कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

A single story appears on the screen, new sorrows of the Kharat Baba discussion

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

7 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

7 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

7 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

7 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

8 hours ago