पदवीधर, बारावी उत्तीर्ण तरुणांसाठी सुवर्णसंधी

नवी दिल्ली :
भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणार्‍या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत 11,558 रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये पदवीधर आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश आहे.
पदांचा तपशील (एकूण पदे : 11,558) या भरतीची विभागणी दोन स्तरांवर करण्यात आली आहे.
पदवीधर उमेदवारांसाठी (8,110 पदे): गुड्स ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, ज्युनिअर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, सीनिअर क्लर्क कम टायपिस्ट आणि चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर. पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी. बारावी पास उमेदवारांसाठी (3,448 पदे): कमर्शियल कम तिकीट क्लर्क, ज्युनिअर क्लर्क कम टायपिस्ट, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट आणि ट्रेन्स क्लर्क. पात्रता : 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण.
वयोमर्यादा आणि सवलत, पदवीधर पदांसाठी: 18 ते 36 वर्षे. बारावी पास पदांसाठी: 18 ते 33 वर्षे. (वयोमर्यादेत एससी/एसटी उमेदवारांना 5 वर्षे आणि ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची सवलत दिली जाईल.)
निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड दोन टप्प्यांतील संगणक आधारित परीक्षा (सीबीटी 1 आणि सीबीटी 2) द्वारे केली जाईल. त्यानंतर पदाच्या आवश्यकतेनुसार टायपिंग टेस्ट किंवा अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट घेतली जाईल आणि शेवटी कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय चाचणी होईल. अर्ज शुल्क : सामान्य/ओबीसी प्रवर्ग : 500 रुपये (परीक्षेनंतर 400 रुपये रिफंड मिळतील). एससी/एसटी/महिला/माजी सैनिक/ईडब्ल्यूएस: 250 रुपये (परीक्षेनंतर पूर्ण शुल्क रिफंड मिळेल).

महत्त्वाच्या बाबी आणि लिंक:

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (रेल्वेच्या अधिकृत प्रादेशिक वेबसाइटवर).
अधिकृत वेबसाइट :  https://www.rrbcdg.gov.in किंवा तुमच्या विभागाच्या (उदा. आरआरबी मुंबई) वेबसाइटवर भेट द्या.
सुधारणा : उमेदवारांनी अर्जात काही चूक केल्यास करेक्शन विंडोचा वापर करून ठराविक शुल्क भरून दुरुस्ती करता येईल.
महत्त्वाची टीप : इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. रेल्वेने रिक्त पदांच्या संख्येत आणि अर्ज करण्याच्या तारखांमध्ये वेळोवेळी बदल केल्याने अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Mega recruitment for 11,558 posts in Railways

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 days ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 days ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

2 days ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

2 days ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 days ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 days ago