नाशिक

त्र्यंबकनगरीत गर्दीचा महापूर अन् नियोजनाचा दुष्काळ

सलग सुट्यांमुळे गर्दीवर नियंत्रणात अपयश

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
शासनाने दुष्काळातून वगळले असले, तरी प्रशासकीय नियोजनाअभावी त्र्यंबकनगरीला सध्या भीषण नियोजनाच्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. पितृपक्ष आणि सलग शासकीय सुट्यांमुळे शहरात भाविकांचा महापूर लोटला आहे. परंतु, या गर्दीच्या व्यवस्थापनात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
कुंभमेळ्याच्या तयारीचे कारण पुढे करत कुशावर्त तीर्थ घाट बंद केला असून, कुंड कोरडाठाक केला आहे. परिणामी, धार्मिक विधीसाठी आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यातच दिवसभर होणारा विजेचा लपंडाव आणि नगरपरिषदेचा विस्कळीत पाणीपुरवठा यामुळे नागरिकांना आणि भाविकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. नळाला पाणी नाही, तर दुसरीकडे खोदलेल्या रस्त्यांमुळे शहरात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. सहा महिन्यांपूर्वी खोदलेले रस्ते अद्याप बुजवण्यात आलेले नाहीत. या खड्ड्यांमध्ये आणि अंधारात धडपडून भाविक जखमी होत आहेत. शहरात ठिकठिकाणी साचलेली अस्वच्छता, भटक्या श्वानांचा वाढलेला वावर आणि डासांचा सुळसुळाट यामुळे येथे नगरपरिषद अस्तित्वात आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

त्र्यंबकवासीयांमध्ये नाराजी
कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार्‍या पितृपंधरवड्यात प्रशासनाच्या धरसोडीच्या कारभाराने त्र्यंबकवासीयांवर आणि भाविकांवर यमयातना भोगण्याची वेळ आणली आहे. लक्ष्मीच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या या पवित्र नगरीला सध्या प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अवदसेचा सामना करावा लागत असून, त्र्यंबकवासीयांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे

 

A tidal wave of crowds and a drought of planning in the holy city of Trimbak.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago