नाशिकमध्ये बंद दाराआड भेट व चर्चा
नाशिक : प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना उघडपणे विरोध करणारे मंत्री छगन भुजबळ आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची नाशिकमध्ये बंद दाराआड भेट व चर्चा झाली. सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री यांनी भुजबळांची भेट घेतली. ही कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे सदावर्ते यांनी स्पष्ट केले असले, तरी भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत तर्क-वितर्क केले जात आहेत.
मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला भुजबळ सातत्याने विरोध करत आले आहेत. मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, अशी भुजबळांची भूमिका आहे. दुसरीकडे, सदावर्ते यांनीही मराठा आरक्षणाच्या मागणीविरोधात कायदेशीर आणि घटनात्मक भूमिका मांडत जरांगे यांच्या आंदोलनाला वेळोवेळी विरोध केला आहे. त्यामुळे जरांगेविरोध हा दोघांच्या सार्वजनिक भूमिकांमधील समान धागा असल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, भेटीत या विषयावर चर्चा झाली की नाही, याबाबत दोघांकडूनही कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.
नाशिकमधील भुजबळ फार्म येथे झालेल्या भेटीनंतर बोलताना सदावर्ते यांनी भुजबळ हे फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे भाष्यकार असल्याचे सांगितले. महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांबाबत भुजबळांकडून प्रेरणा आणि ज्ञान मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. फुले यांच्या ‘गुलामगिरी’ या पुस्तकासंदर्भातील बराक ओबामांच्या आठवणींसह विविध प्रेरणादायी गोष्टी भुजबळांकडून ऐकायला मिळतात, असेही सदावर्ते म्हणाले.
भुजबळांचे लवकरच 80 वे वर्ष सुरू होत असून, त्यानिमित्त विविध कार्यक्रम व्हावेत, अशी इच्छाही सदावर्ते यांनी व्यक्त केली. जयश्री सदावर्ते आणि भुजबळ यांचे संबंध मानवाधिकार आयोगाच्या काळापासूनचे असल्याचे सांगत आजची भेट एकमेकांची विचारपूस करणारी कौटुंबिक भेट होती, असे त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय तर्क-वितर्कांना उधाण
सदावर्ते यांनी भेटीला कौटुंबिक स्वरूप दिले असले, तरी भुजबळ-सदावर्ते यांच्या जरांगेविरोधी भूमिकेच्या पार्श्वभूमीवर बंद दाराआड झालेल्या या अर्धा तासाच्या भेटीला वेगळा राजकीय संदर्भ जोडला जात आहे. प्रत्यक्षात या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत मात्र स्पष्टता नसल्याने तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
Meeting between Bhujbal and Sadavarte sparks speculation due to their shared stance against Jarange.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…