एक चिमुकली गंभीर जखमी
सिन्नर। सिन्नर-ठाणगाव रोडवर आटकवडे शिवारात चालत्या रिक्षातून धाबरून उडी मारल्याने एका शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाला असून एक चिमुकली गंभीर जखमी झाल्याची घटना आज (दि. 1) सकाळच्या सुमारास घडली.
डूबेरे येथील जनता विद्यालयात नुकतीच 10 वीत गेलेली गायत्री अशोक चकणे (14) रा. वडगाव पिंगळा हल्ली मुक्काम आटकवडे व 5 वीतील सायली भगवान आव्हाड (11) रा. आटकवडे या सकाळी महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडावंदन करण्यासाठी व आपले गुणपत्रिका घेण्यासाठी शाळेत गेल्या होत्या. गुणपत्रिका घेऊन घरी येण्यासाठी त्यांनी डूबेरे येथून सिन्नरकडे कोंबड्या घेऊन जाणाऱ्या समीर अहमद शेख रा. डुबेरे यांच्या ऍपे रिक्षाला हात देऊन पाठीमागे बसल्या. रिक्षा आटकवडे शिवारात आली असता रिक्षाचालकाला सदर मुलींना तेथे उतरून देण्याचे लक्षात न राहिल्याने तो सरळ चालू लागला. पाठीमागे बसलेल्या मुलींनी त्याला जोरजोरात हाक मारून रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रिक्षाचालकाला मुलींचा आवाज ऐकू आला नाही. मुलींचा आरडाओरडा एकूण रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांनीही त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो जोरात पुढे चालू लागला. रिक्षा न थांबल्याने दोन्ही मुली घाबरल्या. यावेळी गायत्री चालत्या रिक्षातून रस्त्यावर उडी घेतली. तीला बघून सायलीनेही रिक्षातून उडी घेतली. मात्र, रिक्षा जोरात असल्याने गायत्रीने उडी घेताच तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर सायलीच्या डोक्याला व हाताला मार लागून ती गंभीर जखमी झाली. रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांनी पुढे जाऊन रिक्षाचालकाला थांबवल्यानंतर त्याच्या हा प्रकार लक्षात आला. स्थानिकांनी तात्काळ धाव घेत सिन्नरमधील श्री स्वामी समर्थ रुग्णवाहिकाचालक गणेश काकड यांना संपर्क साधला. गणेश काकड यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत मुलींना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, गायत्रीच्या डोक्याला जबर मार लागक्याने तिचा मृत्यू झाक्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सायलीच्या हाताला व डोक्याला मार लागक्याने तिच्यावर उपचार सुरू आहे. पोलिसांना घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षण विजय माळी, एएसआय सारूकते व पोलीस नाईक चेतन मोरे यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. रुग्णालयात भेट देत जखमी सायलीच्या जबाबावरून रिक्षाचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी गायत्रीच्या नातेवाईकांकडून रिक्षाचालकाविरुद्ध तक्रार दाखल करण्याचे काम सुरु होते. अधिक तपास एएसआय सारूकते करत आहेत.
मामाने केला सांभाळ
गायत्री ही वडगाव पिंगळा येथील असून काही वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. तेव्हापासून गायत्रीचा आटकवडे येथील मामाने सांभाळ केला होता. लहानपणापासून ती मामाकडेच राहत असल्याने डूबेरे येथील जनता विद्यालयात शिक्षण घेत होती. आज (दि.1) तिचा 9 वी चा रिझल्ट आला असून ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन 10 वीत गेली होती. तिच्या मृत्यूने आटकवडे परिसरासह वडगाव पिंगळा येथे शोककळा पसरली आहे.
‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…
अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…
बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…
पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…
109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…
1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…