नाशिक

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर

नाशिक : प्रतिनिधी
मार्च 2026 मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वार्‍यामुळे नाशिक विभागातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. राज्य शासनाने विभागासाठी 145 कोटी 87 लाख 70 हजारांंच्या मदतीस मंजुरी दिली आहे. नाशिक विभागातील एक लाख 46 हजार 577 शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झाले. 83 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचे नुकसान झाले.
महसूल व कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार द्राक्षबागा, कांदापीक, फळबागा, भाजीपाला तसेच गहू व इतर हंगामी पिकांना मोठा फटका बसला होता. विशेषतः काढणीस आलेल्या द्राक्षे व कांदा पिकाचे अवकाळी पावसामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. अनेक भागांत गारपिटीमुळे फळबागांचे नुकसान होऊन उत्पादनाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला, तसेच बाजारमूल्यही घटले.
नाशिक जिल्ह्यातील 65 हजार 756 शेतकरी बाधित झाले. धुळे जिल्ह्यात 14 हजार 275, जळगाव 37 हजार 991, अहिल्यानगर 27 हजार 602 तर नंदुरबार जिल्ह्यात 953 शेतकरी प्रभावित झाले. शासन निर्णय दि. 18 मे 2026 नुसार ही मदत मंजूर करण्यात आली आहे.
दरम्यान, शासनाने मंजूर निधी थेट शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. जिल्हाधिकार्‍यांकडून पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून निधी वितरणाला गती देण्यात येत आहे. कृषी विभागाने भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी पीकविमा, हवामान आधारित शेतीपद्धती व संरक्षित शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.

इतर विभागांतील स्थिती
पुणे विभागातील 11 हजार 626 शेतकरी बाधित झाले. या विभागातील 5 हजार 616.93 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. दहा कोटी 52 लाख 32 हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागातील सात हजार 322 शेतकर्‍यांचे तीन हजार 749.22 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. या विभागासाठी सहा कोटी 82 लाख 22 हजारांंची मदत मंजूर करण्यात आली आहे. नागपूर विभागातील एक हजार 96 शेतकर्‍यांना एक कोटी 64 हजारांंची मदत जाहीर झाली. 588 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
कोकण विभागात सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील 413 शेतकरी बाधित झाले. 99.18 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या विभागासाठी 24.13 लाखांंची मदत मंजूर करण्यात आली. अमरावती विभागात 561 शेतकरी प्रभावित झाले असून, 213.14 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या विभागासाठी 36.43 लाखांंचा निधी मंजूर केला आहे.

Nashik division hit hardest by severe weather

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago