नाशिक

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर बनत चालली असून, प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 109 गावे आणि 238 वाड्यांना सध्या 118 खासगी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. या टँकरच्या दररोज 256 फेर्‍या होत असून, सुमारे दोन लाख 574 नागरिकांना दिलासा मिळत आहे.
जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, येवला तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई जाणवत आहे. येथे 36 गावे आणि 47 वाड्यांसाठी 33 टँकरच्या 55 फेर्‍या सुरू आहेत. मालेगाव तालुक्यात 16 गावे व 48 वाड्यांना 16 टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. इगतपुरी, सिन्नर, नांदगाव, देवळा, चांदवड, सुरगाणा व पेठ तालुक्यांतही टंचाईची तीव्रता वाढली आहे.
बहुतांश भागांत 24 हजार लिटर क्षमतेच्या टँकरचा वापर करण्यात येत असून, काही ठिकाणी दहा हजार व 12 हजार लिटर क्षमतेचे टँकरही कार्यरत आहेत. प्रशासनाने गावांसाठी पाच आणि टँकरसाठी 47 विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. आवश्यकतेनुसार आणखी टँकर वाढविण्याची तयारी सुरू आहे.
दरम्यान, बागलाण, नाशिक, कळवण आणि निफाड तालुक्यांत सध्या टँकरची आवश्यकता नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आगामी काळात पावसाला उशीर झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या वर्षी सुरू होते 143 टँकर
गेल्या वर्षी मे महिन्यात 143 टँकरद्वारे जिल्ह्यात पाणीपुरवठा करण्यात येत होता. यंदा 118 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, यंदा टँकरची संख्या कमी असली, तरी उन्हाची दाहकता अधिक असल्याने येत्या काही दिवसांत टँकरच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पाणी जपून वापरण्याचे आवाहन
उन्हाची दाहकता आणि यंदा पावसाला विलंब होण्याचा अंदाज लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन केले आहे.

Water shortage is severe in the district.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago