नाशिक दिंडोरी रोडवर भीषण अपघातात 5 ठार

नाशिक दिंडोरी रोडवर भीषण अपघातात 5 ठार

दिंडोरी  : प्रतिनिधी

नाशिक – दिंडोरी या रस्त्यावरील आरोग्य विज्ञानविद्यापीठाजवळील सचिन पेट्रोलपंपाजवळ बोलेरो वाहनावरील चालकाचा ताबा सुटून समोर असलेल्या मोटारसायकलवर धडक देवून झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नाशिक – दिंडोरी रस्त्यावरील आरोग्य विज्ञानविद्यापीठाजवळील सचिन पेट्रोलपंपासमोर बोलेरा वाहन क्रमांक (एमएच 15 जीआर 4105) ही बोलेरा वाहन भरधाव वेगाने जात असतांना ओव्हरटेक करतांना समोरील येणार्‍या वाहनाचा अंदाज न आल्याने समोरुन जात असलेल्या मोटारसायकल क्रमांक ( एमएच 15 एचएल 3156) या मोटारसायकला धडक दिली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात बोलेरो वाहनातील तिन जण तर मोटारसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी बोलेरो वाहनातील मुकेश कुमार यादव (25), अमन रामकिसन यादव (18),कुसूमदेवी रामकिसन यादव (45) सर्व रा. ड्रिम कॅसल, नाशिक, (मुळ रा. बनारस, युपी),
तर मोटारसायकलवरील अनिल चिमाजी बोडके आणि राहुल अनिल बोडके )रा. शिंप्पी टाकी, ता. निफाड, जि. नाशिक) यांचा जागीच मृत्यू झाला. तर बोलेरो वाहनातील अब्बल रामकिसन यादव (20), विकास कपिलदेव यादव (39), रामकिसन श्रीनाथ यादव (50) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची घटना दिंडोरी पोलिस ठाण्याला समजताच पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दिंडोरी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

15 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

15 hours ago