समृद्धी महामार्गावर खासगी बस पेटली; २५ जणांचा मृत्यू
औरंगाबाद –
समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातांची मालिका सुरूच आहे. सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजता टायर फुटल्याने खासगी बस उलटली व पेट घेतला. यात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. नाशिकमधील औरंगाबाद रोडवरील मिर्ची हॉटेल चौकात गतवर्षी अशाच अपघातात १४ जणांना प्राण गमवावे लागले होते.
नागपूरवरून खासगी प्रवासी बस ही समृद्धी महामार्ग मार्गे पुण्याला जात होती. दरम्यान सिंदखेड राजा नजीक बसचे टायर फुटल्याने ही बस रस्त्यावर उलटली. या दरम्यान सिमेंट रस्त्यावर घर्षण होऊन बसने पेट घेतला आणि बघता बघता आगीने रौद्ररुप घेतले. परंतू अर्धवट झापेत असलेल्या प्रवाश्यांना बसमधून बाहेर पडता न आल्याने यात ही मोठी झाली, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान अपघातामधील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…