नाशिक

चोरीप्रकरणी रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद; 21 हजारांचा मुद्देमाल जप्त

सिडको : विशेष प्रतिनिधी
सातपूर आणि गंगापूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील दोन चोरीच्या गुन्ह्यांची उकल करत सातपूर पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून 21 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रितेश भगवान सुंबर (वय 19, रा. अशोकनगर, सातपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी 1 जून ते 2 जून 2026 दरम्यान श्रमिकनगर येथील द्वारकाधीश पाताळगुंफा श्रीकृष्ण मंदिरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून रोख रक्कम, चांदीचे दागिने आणि तीन मोबाइल फोन चोरी केले होते. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात तसेच गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकार्‍यांनी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस हवालदार दीपक खरपडे, पोलीस अंमलदार सचिन आजबे, सोनू खाडे आणि सागर गुंजाळ यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपीची ओळख पटवली. मात्र, आरोपी फरार होता. दरम्यान, पोलीस हवालदार दीपक खरपडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी जयगणेश कॉलनी, श्रमिकनगर परिसरात असल्याचे समोर आले. त्यानुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल आहेर, पोलीस हवालदार दीपक खरपडे, तुषार देसले तसेच सागर गुंजाळ, रवींद्र जाधव, सचिन आजबे, सोनू खाडे, पारस देशमुख आणि संजय दराडे यांच्या पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीतील 21 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सातपूर पोलीस ठाण्यातील चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. ही कारवाई सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल आहेर, पोलीस हवालदार दीपक खरपडे, तुषार देसले तसेच पोलीस कर्मचारी सागर गुंजाळ, रवींद्र जाधव, सचिन आजबे, सोनू खाडे, पारस देशमुख आणि संजय दराडे यांनी केली.

Accused with a criminal record arrested in theft case; stolen property worth ₹21,000 seized.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

लाल कांद्याच्या दरात 400 रुपयांची घसरण

लासलगाव : वार्ताहर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवार (दि. 19) आणि शुक्रवार (दि. 20)…

19 hours ago

सगुण-निर्गुण एकचि पांडुरंग!

कार्तिकी एकादशी जिला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी…

19 hours ago

थेट विरोध

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरूच आहे. शरद पवारांच्या आजारपणात विलीनीकरणाची चर्चा…

19 hours ago

ड्रेनेज, पाणीपुरवठ्याच्या 370 कोटींच्या खर्चाला मंजुरी

सिंहस्थासाठी साधुग्राममध्ये पंधराशे एकरमध्ये काम होणार नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील साधुग्राममध्ये विविध…

20 hours ago

इलेक्ट्रिक बससाठी स्वतंत्र पासची आवश्यकता नाही

अतिरिक्त भाडेही नाही; सिटीलिंकची माहिती नाशिक : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत नाशिकसाठी 50 इलेक्ट्रिक बसेस…

20 hours ago

स्वीकृतच्या दहा नगरसेवकांची अखेर नियुक्ती

महासभेत घोषणा; दुसरी जागा ठाकरे गटाने मिळवलीच नाशिक : प्रतिनिधी संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या…

20 hours ago