नाशिक

शेतकर्‍यांचा सातबारा कोरा होण्याच्या मार्गावर

2017 व 2019 च्या कर्जमाफीतील वंचितांनाही मिळणार लाभ

मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 9) राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील शेतकर्‍यांसाठी अतिशय मोठा आणि धडाकेबाज निर्णय घेण्यात आला आहे. मागील कर्जमाफी योजनांमध्ये तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांना आता कर्जमाफीचा थेट फायदा मिळणार आहे. या निर्णयासाठी राज्य सरकारने 14 हजार कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे.

राज्यात 2017 आणि 2019 मध्ये जाहीर झालेल्या कर्जमाफी योजनांदरम्यान अनेक शेतकरी अटी व शर्तींमध्ये किंवा तांत्रिक त्रुटींमुळे अडकले होते. या वंचित शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, अशी शेतकरी संघटनांकडून आणि विरोधकांकडून सातत्याने मागणी होत होती. मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रलंबित प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आला आहे.
नव्या निर्णयानुसार या जुन्या प्रलंबित प्रकरणांना निकाली काढले जाईल, ज्यामुळे राज्यातील हजारो शेतकर्‍यांचा सातबारा कोरा होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
याआधी नुकत्याच (2 जून) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतची पीक कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे 56 लाख पात्र शेतकर्‍यांना होणार आहे. जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करतात, त्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. या संपूर्ण योजनेसाठी राज्यभरातील 65 लाख बँक खात्यांचा विचार करता 36,585 कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे.
विधान परिषदेच्या निवडणूक आचारसंहितेमुळे या निर्णयाच्या अधिकृत घोषणेला व अंमलबजावणीला काही काळ स्थगिती देण्यात आली होती. मात्र, आचारसंहिता संपताच या निर्णयांची थेट अंमलबजावणी सुरू होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

मोठा आर्थिक आधार ठरणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्त्वाखालील महायुती सरकारने घेतलेले हे निर्णय कृषी क्षेत्रासाठी मोठा आर्थिक आधार ठरणार आहेत. आगामी खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकर्‍यांना नवे पीककर्ज विनाअडथळा घेता यावे आणि ते थकबाकीदारांच्या यादीत जाऊ नयेत, यासाठी सरकारने हे जलद पाऊल उचलले आहे.

 

Farmers’ 7/12 extracts on the path to becoming debt-free.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

लाल कांद्याच्या दरात 400 रुपयांची घसरण

लासलगाव : वार्ताहर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवार (दि. 19) आणि शुक्रवार (दि. 20)…

19 hours ago

सगुण-निर्गुण एकचि पांडुरंग!

कार्तिकी एकादशी जिला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी…

19 hours ago

थेट विरोध

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरूच आहे. शरद पवारांच्या आजारपणात विलीनीकरणाची चर्चा…

20 hours ago

ड्रेनेज, पाणीपुरवठ्याच्या 370 कोटींच्या खर्चाला मंजुरी

सिंहस्थासाठी साधुग्राममध्ये पंधराशे एकरमध्ये काम होणार नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील साधुग्राममध्ये विविध…

20 hours ago

इलेक्ट्रिक बससाठी स्वतंत्र पासची आवश्यकता नाही

अतिरिक्त भाडेही नाही; सिटीलिंकची माहिती नाशिक : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत नाशिकसाठी 50 इलेक्ट्रिक बसेस…

20 hours ago

स्वीकृतच्या दहा नगरसेवकांची अखेर नियुक्ती

महासभेत घोषणा; दुसरी जागा ठाकरे गटाने मिळवलीच नाशिक : प्रतिनिधी संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या…

20 hours ago