नाशिक

आश्रमशाळा विद्यार्थ्यांचे आरोग्य अधिक सुदृढ होणार

अ‍ॅनिमिया मुक्तीसाठी ’सीएसीआर’सोबत सामंजस्य करार

नाशिक : प्रतिनिधी
आदिवासी विकास विभागाने राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, तसेच एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांमध्ये आढळणारी अ‍ॅनिमियाची (रक्तक्षय) समस्या दूर करण्यासाठी विभागाने सिटिझन्स असोसिएशन फॉर चाइल्ड राइट्स (सीएसीआर) या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. त्याअंतर्गत या शाळांमध्ये विशेष अ‍ॅनिमिया निवारण कार्यक्रम राबविला जाणार आहे.
आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अ‍ॅनिमिया हा एक मोठा अडथळा ठरत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची आरोग्यस्थिती, पोषण, शालेय उपस्थिती व बौद्धिक विकासावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अ‍ॅनिमिया निवारण कार्यक्रम हाती घेतला आहे. या संपूर्ण उपक्रमाचा खर्च सीएसीआर संस्था करणार आहे.
अ‍ॅनिमिया निवारण कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रकल्प अधिकारी, मुख्याध्यापक, निवासी परिचारिका, अधीक्षक आणि संगणक शिक्षक यांच्यावर विविध जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सीएसीआर संस्थेच्या मदतीने ऑगस्ट 2026 अखेर पहिली तपासणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानंतर दर तीन महिन्यांनी नियमित फॉलोअप तपासणी केली जाणार आहे.
या सामंजस्य कराराप्रसंगी आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड, अपर आयुक्त (मुख्यालय) डिगंंबर चव्हाण, दिनकर पावरा, उपायुक्त संतोष ठुबे, शशिकला अहिरराव, सीएसीआर संस्थेचे सीईओ नितीन वाधवानी आदी उपस्थित होते.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या उत्तम आरोग्य आणि दर्जेदार शिक्षणाला नेहमीच प्राधान्य राहिले आहे. आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात मअ‍ॅनिमियाफ हा एक गंभीर शारीरिक अडथळा असल्याचे समोर आले होते. अ‍ॅनिमियामुक्तीसाठी ङ्गसीएसीआरफ संस्थेसोबत एक महत्त्वाकांक्षी सामंजस्य करार केला आहे. त्यामाध्यमातून विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी एक भक्कम कवच निर्माण करत आहोत.
-लीना बनसोड, आयुक्त
आदिवासी विकास विभाग

The health of Ashram school students will improve.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago