नाशिक

येवल्यात प्लास्टिकबंदी विरोधात कारवाई

44 किलो प्लास्टिक जप्त; 21 हजार रुपये दंड वसूल

येवला : प्रतिनिधी
राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदीच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी येवला नगर परिषदेच्या वतीने पुन्हा एकदा शहरात धडक कारवाई करण्यात आली. मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील आठवडे बाजार
परिसरासह विविध भागांत ही मोहीम राबविण्यात आली.
या कारवाईदरम्यान बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या व इतर प्लास्टिक साहित्याचा वापर करणार्‍या व्यापार्‍यांवर कारवाई करण्यात आली. नगर परिषद पथकाने एकूण 44 किलो प्लास्टिक जप्त केले. नियमांचे उल्लंघन करणार्‍या दुकानदारांकडून 20 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला.
प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. नाले, गटारी व जलवाहिन्या तुंबण्याच्या समस्या निर्माण होते. जनावरांच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याने शासनाने प्लास्टिक वापरावर बंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिक व व्यापार्‍यांनी पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करावा, असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

कारवाईला सहकार्य करावे

पालिकेच्या स्वच्छता निरीक्षक पूनम भामरे यांनी सांगितले की, प्लास्टिकबंदी नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध कारवाई यापुढेही नियमित सुरू राहणार आहे. व्यापारी व नागरिकांनी बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर टाळून नगर परिषदेच्या कारवाईस सहकार्य करावे. या मोहिमेत पालिकेतील स्वच्छता अधिकारी दीपक जावळे, प्रकल्प अधिकारी संदीप बोढरे, कर्मचारी लखन बाकळे, वृषाली अहिरे, राहुल जाधव आदींनी सहभाग घेतला. शहर स्वच्छ, सुंदर व प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी अशी कारवाई सातत्याने करण्यात येणार आहे.

Action taken against plastic ban violations in Yeola

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago