जमीन पूर्ववत करण्यास कंपनीची तयारी
पंचवटी : प्रतिनिधी
आडगाव येथील नवीन पाझर तलाव परिसरात कुंभमेळा विकासकामाच्या नावाखाली खासगी शेतजमिनीवर झालेल्या कथित
बेकायदेशीर उत्खननाच्या वादाने मंगळवारी (दि.23) तीव्र स्वरूप धारण
केले.अधिकृत मोजणीत शेतकर्यांच्या जमिनीचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संतप्त शेतकर्यांनी घटनास्थळी ठिय्या आंदोलन करत उत्खननाचे काम बंद पाडले. अखेर संबंधित स्वस्तिक इन्फ्रा लॉजिस्टिक प्रा. लि. कंपनीने नुकसानग्रस्त जमीन पूर्ववत करून देण्याचे
आश्वासन दिल्याने तात्पुरता तोडगा निघाला.
आडगाव येथील गट क्रमांक 1068/4 मध्ये हिरामण रंगनाथ लोहकरे, गवाजी रामभाऊ लोहकरे, दौलत अर्जुन लभडे यांच्यासह अनेक शेतकर्यांची शेती आहे. या परिसरात सुरू असलेल्या पाझर तलावाच्या उत्खननाचे काम मूळ हद्दीबाहेर जाऊन शेतजमिनीत घुसखोरी करत असल्याचा आरोप शेतकर्यांनी केला होता. याबाबत सुरुवातीपासूनच त्यांनी आक्षेप नोंदविला होता. शेतकर्यांच्या मागणीनंतर झालेल्या शासकीय मोजणीत काही क्षेत्र बाधित झाल्याचे समोर आले. त्यावेळी नुकसान झालेली जमीन पूर्ववत करण्याचे आश्वासन कंपनीकडून देण्यात आले होते. मात्र, मोजणी पूर्ण होऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने शेतकर्यांचा संताप वाढला. हिरामण लोहकरे, गवाजी लोहकरे, दौलत लभडे, अंबाजी लभडे, केशव लभडे, गोरख लभडे, तानाजी लभडे, भाऊसाहेब लभडे, रघुनाथ लभडे, लक्ष्मण लभडे, शरद लभडे, संजय लभडे, संपत लभडे, सुदाम लभडे, गणपत लोहकरे, वाल्मीक लोहकरे, विठ्ठल लोहकरे, शिवाजी लोहकरे, सुदाम लोहकरे आणि बेबी लभडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र आले. त्यांनी प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करत उत्खननाचे काम थांबविले.
आमच्या उपजीविकेचा आधार असलेली सुपीक जमीन उद्ध्वस्त करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त क्षेत्र पूर्ववत न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकर्यांनी दिला.
दरम्यान, जिल्हाधिकार्यांकडे दाखल करण्यात आलेल्या लेखी तक्रारीमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. शेतकर्यांच्या तीव्र विरोधानंतर कंपनीने बाधित जमीन पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले असले, तरी प्रत्यक्षात ही कार्यवाही कधी व कशा प्रकारे केली जाते, याकडे आता परिसरातील शेतकरी आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे.
Farmers outraged over illegal excavation.
आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…
किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…
घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…
शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…
दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…
708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…