एप्रिलपासून कार्यवाही; नागरिकांची वणवण थांबणार
नाशिक : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. यावरून महासभेत वादंग झाल्यानंतर महापौरांनी शहराला अतिरिक्त पाणी टँकर सोडण्याचे
निर्देश पाणीपुरवठा विभागाला दिले होते. दरम्यान, शहरात पाण्याची मागणी लक्षात घेता, 15 एप्रिलपासून शहराला दररोज चारशे एमएलडी (दशलक्ष) पाणीपुरवठा केला जाणार आहे. यापूर्वी तीनशे एमएलडी पाणीपुरवठा केला जात असे. दरम्यान, यामुळे पंचवटीसह नाशिकरोडमध्ये पाण्याची समस्या दूर होणार आहे.
गंगापूर धरण ते बारा बंगला या थेट बारा किलोमीटर जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या 15 एप्रिलपासून शहराला या नवीन जलवाहिनीने पाणीपुरवठा सुरू होईल. पाणीपुरवठा विभागाने सिंहस्थ व भविष्यात सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी गंगापूर धरण ते बारा बंगला अशी थेट जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू केले होते. हे काम अंतिम टप्प्यात आहे. सध्या जुन्या दोन समांतर बाराशे
मिलिमीटर व्यासाच्या दोन जलवाहिन्यांतून पाणीपुरवठा होतो. त्या तीस वर्षांपूर्वी टाकल्या होत्या. त्या जीर्ण झाल्या असून, त्यातून पाणीगळतीही मोठ्या प्रमाणात होते. शिवाय दिवसाला तीनशे एमएलडीपेक्षा जादा पाणीपुरवठा करण्याची त्यांची क्षमता नव्हती. त्यामुळे विस्कळीत व अपुरा पाणीपुरवठा ही मोठी समस्या आहे. पण नवी जलवाहिनीमुळे ही समस्या मार्गी लागेल. सध्या जुन्या वाहिनीची पाणीपुरवठा क्षमता दिवसाला 300 एमएलडी असून, त्यामुळे शहरात पूर्णक्षमतेने पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. नवीन जलवाहिनीची क्षमता 400 एमएलडी असल्याने शहराला गरजेनुसार अतिरिक्त पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. त्यामुळे विस्कळीत व अपुर्या पाणी पुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी निकाली निघेल. गंगापूर धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानादेखील शहरवासीय विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे हैराण झाले आहेत. महापालिकेला पाणीप्रश्नासाठी विशेष महासभा बोलवावी लागली होती. नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. तरीदेखील हा प्रश्न मार्गी लागला नसून पाण्याची बोंबाबोंब कायम आहे. पण लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल.
अठराशे मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीमुळे दिवसाला चारशे एमएलडी पाणीपुरवठा करता येईल. पंधराव्या वित्त आयोगाने थेट जलवाहिनी योजनेसाठी महापालिकेला दोनशे कोटी रुपये निधी दिला. त्यातून हे काम सुरू आहे. पाणीप्रश्न मार्गी लागेल. थेट जलवाहिनी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे.
– रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा, मनपा
Additional 100 million water supply to the city
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…