नाशिक

नाशकात श्रीरामाच्या गाण्यांच्या गजराचा जागतिक विक्रम

वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद; ’रसिक सूर’ची सलग चौथी कामगिरी

नाशिक : प्रतिनिधी
नाशिकमध्ये ’रसिक सूर’च्या माध्यमातून श्रीरामाच्या गाण्यांचा अभूतपूर्व गजर करत जागतिक विक्रमाची नोंद दि. 22 मार्च रोजी करण्यात आली. वंडर बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन या संस्थेकडून भोंसला मिलिटरी स्कूलच्या कोदंडधारी रामाच्या साक्षीने तब्बल एक हजार 111 नागरिकांच्या सहभागातून सलग 101 मीटर श्रीराम गाण्यांचा विक्रम करण्यात आला. रसिक सूरचा हा सलग चौथा जागतिक विक्रम ठरला आहे.
दि. 22 मार्च रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत एकूण 22 गाणी सादर करण्यात आली. या कार्यक्रमासाठी भोंसला मिलिटरी स्कूलच्या समितीने मैदान उपलब्ध करून दिले होते. अनघा धोडपकर आणि संयोजक हिमांशु धोडपकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संगीत संयोजन रोहिणी जोशी यांनी, तर वाद्य संयोजन नितीन वारे यांनी केले. नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके यांचे सहकार्य लाभले.
या उपक्रमात एकूण 42 भजनी मंडळांचा सहभाग होता. वंडर बुक ऑफ रेकॉर्डचे परीक्षक अ‍ॅमी छेडा व अथर्व शुक्ल यांनी ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सर्वांचा गौरव केला.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे, माजी आयुक्त रामचंद्र कुलकर्णी आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर रसिक सूरच्या सदस्यांनी तन्मय कुलकर्णी यांच्या प्रमुख शंखनादाने विक्रमाची सुरुवात केली.
व्यासपीठावर हार्मोनियमची साथ रोहिणी जोशी, मनीषा जोशी, शिल्पा पंडित, सुवर्णा बडगुजर, उर्मिला पाटील, नंदकुमार देशपांडे, डॉ. श्रीपाद घोलप यांनी दिली. तबल्यावर नितीन वारे यांच्या शिष्यांनी साथ दिली. गायकांमध्ये अनघा धोडपकर, तृप्ती दीक्षित, प्रज्ञा वणीकर, मंगेश खोत, संगीता नागरे व इतर सहकार्‍यांचा सहभाग होता. टाळवादनात वृंदा लवाटे, शुभांगी शिंपी, पूनम ठाकूर, राजश्री कवटे, सारिका शिंदे यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.
या कार्यक्रमाच्या सरावासाठी लक्षिका सभागृह उपलब्ध करून देण्यात आले होते. साउंंड व्यवस्थापन पुष्कर जोशी यांनी, तर छायाचित्रण संजय गाडे यांनी केले.

World record for the blare of Shri Ram songs in Nashik

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

1 hour ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

1 hour ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

1 hour ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

1 hour ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

1 hour ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

2 hours ago