नाशिक : प्रतिनिधी
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागीय राज्य परिवहन महामंडळातर्फे नागरिकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा देण्यासाठी अतिरिक्त बसफेर्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
या जादा फेर्यांमुळे जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या गावी जाण्यास आणि परतीच्या प्रवासासाठी अधिक सोय करण्यात आली आहे.
विभाग नियंत्रक किरण भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक विभागातील विविध आगारांतून नियमित फेर्यांव्यतिरिक्त खालील प्रमुख मार्गांवर अतिरिक्त बससेवा सुरू करण्यात आली आहे.
नाशिक-1 आगार : नाशिक-चोपडा, नाशिक-धुळे, नाशिक-छत्रपती संभाजीनगर, नाशिक-बोरीवली, नाशिक-वापी.
नाशिक-2 आगार : नाशिक-नंदुरबार, नाशिक-जळगाव, नाशिक-पाचोरा, नाशिक-सप्तशृंगगड.
मालेगाव आगार : मालेगाव-छत्रपती संभाजीनगर, मालेगाव-शिवाजीनगर, मालेगाव-चाळीसगाव, नाशिक-नंदुरबार.
इगतपुरी, नांदगाव, लासलगाव, पेठ, येवला, सटाणा, कळवण, पिंपळगाव या आगारांतूनही धुळे, शिरपूर, शिर्डी, शिवाजीनगर, अहिल्यानगर, नंदुरबार आदी मार्गांवर अतिरिक्त फेर्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
याशिवाय नाशिक-सटाणा, नाशिक-बोरीवली, नाशिक-सप्तशृंगगड, नाशिक-त्र्यंबकेश्वर, नाशिक-शिर्डी या मार्गांवर विद्युत बससेवाही सुरू करण्यात आली आहे. नाशिक-शिवाजीनगर आणि नाशिक-धुळे मार्गावर दर 15 मिनिटांनी बस उपलब्ध असतील, तर नाशिक-छत्रपती संभाजीनगर (येवलामार्गे), नंदुरबार आणि सटाणा मार्गावर दर अर्ध्या तासाने बसफेर्या सुरू असतील.नागरिकांनी या अतिरिक्त बसफेर्या व पास योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन किरण भोसले, विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, नाशिक यांनी केले आहे.
आवडेल तेथे कोठेही प्रवास पास योजनेत सवलत
महामंडळाने प्रवाशांच्या सुविधेसाठी आवडेल तेथे कोठेही प्रवास पास योजनेंतर्गत दरात कपात केली आहे. दि. 8 ऑक्टोबर 2025 पासून लागू झालेले सुधारित दर खालीलप्रमाणे…
सेवेचा प्रकार 4 दिवसांचा पास 7 दिवसांचा पास
साधी/ जलद/
रात्रसेवा/ अंतरराज्य 685 (मुले) 1,364 (प्रौढ) 1,194 (मुले) 2,382 (प्रौढ)
शिवशाही (आसनी,
आंतरराज्यासह) 911 (मुले) 1,818 (प्रौढ) 1,590 (मुले) 3,175 (प्रौढ)
12 मी. ई-बस (ई-शिवाई 1,038 (मुले), 2,072 (प्रौढ) 1,812 (मुले) 3,619 (प्रौढ)
(मुलांचे दर पाच वर्षांपेक्षा जास्त आणि 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी लागू आहेत. सर्व दरांमध्ये अपघात सहाय्यता निधीचा समावेश आहे.)
कांदा प्रश्नासाठी शेतकऱ्यांचे दिल्लीत कांद्याच्या माळा घालून अर्ध नग्न आंदोलन स्वतंत्र भारत पक्षाचा आंदोलकांना पाठिंबा…
शॉपिंग सेंटरजवळ झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली चिरडून मृत्यू सिडको : दिलीपराज सोनार जुने सिडको परिसरातील शॉपिंग…
लाडकी बहीण योजनेच्या केवायसीला स्थगिती लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मुंबई: राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा…
राधाकृष्णनगरमध्ये परप्रातीय स्वयंघोषित भाईचा राडा गल्लीतील नागरिकांना कापून टाकण्याची धमकी देत दहशत सातपूर : सातपूर…
जिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांना दाखल करण्यास नकार — छावा क्रांतीवीर सेनेकडून रुग्णालय प्रशासनाचा तीव्र निषेध!…
सिडको : विशेष प्रतिनिधी वृद्धेच्या घरी जाऊन चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत तिच्याकडून…