नाशिक : प्रतिनिधी
शाळांमधील विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित, पौष्टिक व संतुलित आहार मिळावा, यासाठी अन्न सुरक्षा व मानके (शाळेतील मुलांसाठी सुरक्षित अन्न आणि संतुलित आहार) विनियम, 2020 ची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दिल्या.
यावेळी खासदार भास्कर भगरे उपस्थित देखील उपस्थित होते. यासंदर्भात आज त्यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे गट विकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन आवश्यक निर्देश दिले.
या बैठकीस अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त मंगेश माने, नाशिक विभाग, सहाय्यक आयुक्त संदीप देवरे, सहाय्यक आयुक्त दिनेश तांबोळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) साईलता सामलेटी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी मनोहर सूर्यवंशी, अनिल पुदाट, लेखाधिकारी विनोद खैरनार यांच्यासह सर्व तालुक्यांचे गट विकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी उपस्थित होते.
शाळांच्या परिसरात जास्त चरबी, मीठ व साखर असलेल्या अन्नपदार्थांची विक्री, जाहिरात, विपणन अथवा मोफत वितरणास प्रतिबंध करण्यात आला आहे. शाळेच्या प्रवेशद्वारापासून कोणत्याही दिशेला 50 मीटर परिसरात अशा अन्नपदार्थांची विक्री होणार नाही, याची संबंधित ग्रामपंचायत, शाळा प्रशासन व शाळा व्यवस्थापन समित्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले.
आपल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या सूचनांनुसार आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. विद्यार्थ्यांना सुरक्षित व पौष्टिक आहार मिळणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी स्पष्ट केले.
शाळांमध्ये सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छता, अन्न साठवणूक, तापमान नियंत्रण, किड नियंत्रण, कचरा व्यवस्थापन तसेच अन्न हाताळणार्या कर्मचार्यांची वैयक्तिक स्वच्छता याबाबतही काटेकोर उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रत्येक शैक्षणिक वर्षात अन्न सुरक्षा व पोषण विषयक जनजागृती सत्रे घेण्यावरही भर देण्यात आला.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत जिल्ह्यातील शासकीय तसेच खाजगी शाळांची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. त्यामुळे सर्व संबंधितांनी दिलेल्या निर्देशांची वेळेत अंमलबजावणी करून आवश्यक अनुपालन सुनिश्चित करावे, असे आवाहन करण्यात आले.
Administration keeps a close watch on nutritional diet.
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…