नाशिक

त्र्यंबकनगरी शिवभक्तांच्या गर्दीने गजबजली

पहिल्या सोमवारी बम बम भोलेच्या गजराने परिसर दुमदुमला

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
श्रावणाच्या पहिल्या सोमवारी त्र्यंबकनगरी शिवभक्तांच्या गर्दीने गजबजली. पहाटेपासूनच श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दिवसभर बम बम भोले आणि हर हर महादेवच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
शनिवार आणि रविवारी झालेली वाहतूक कोंडी सोमवारी प्रशासनाच्या सुयोग्य नियोजनामुळे शिथिल झालेली दिसली. खंबाळे येथील वाहनतळ आणि वाहतूक मार्गातील बदलांमुळे खासगी वाहनांची गर्दी नियंत्रणात राहिली. खंबाळे ते सिंहस्थ बसस्थानकादरम्यान बससेवा पुरवण्यात आली, तेथून पुढे 2 किमी अंतर पायी किंवा रिक्षाने गाठावे लागले.
विशेष दर्शन बंद : मंदिरात 200 रुपयांचे थेट दर्शन आणि 2500 रुपयांचे अतितातडीचे दर्शन पूर्णपणे बंद ठेवून भाविकांना केवळ पूर्व दरवाजा दर्शनबारीने प्रवेश देण्यात आला. सुविधा व पाहणी : देवस्थान ट्रस्टने तात्पुरते निवारा शेड उभारले असून, पिण्याच्या पाण्याची सोय केली. तहसीलदार गणेश जाधव यांनी स्वतः रांगेच्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊन पाहणी करत भाविकांच्या अडचणी जाणून घेतल्या. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व ट्रस्टचे सचिव गोविंद जाधव यांनीही प्रशासनाशी समन्वय ठेवत व्यवस्थेचा आढावा घेतला.
प्रदक्षिणा, पालखी सोहळा : कुशावर्त तीर्थावर रविवारी सायंकाळपासूनच भाविकांनी स्नानासाठी गर्दी केली होती.
तेथून हजारो भाविक ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी व मूळ गंगेच्या उगमस्थानी दर्शनासाठी रवाना झाले. दुपारी 3 वाजता त्र्यंबकराजाची पालखी कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी निघाली, तेव्हा दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
नागपंचमी व श्रावणात होणार्‍या कालसर्प शांती विधी आणि अभिषेक पूजेसाठी येणार्‍या भाविकांची संख्या यंदा लक्षणीय घटल्याचे पुरोहितांनी सांगितले. ऑनलाईन व अल्प दरात होणार्‍या पूजा-अभिषेकांमुळे येथील प्रत्यक्ष धार्मिक विधींसाठी येणार्‍या भाविकांच्या संख्येवर परिणाम झाल्याची चर्चा आहे.

स्वच्छतागृहांची टंचाई, धार्मिक विधींवर परिणाम

सिंहस्थ कामांमुळे शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह तोडण्यात आल्याने कुशावर्त परिसरात स्वच्छतागृहांची उणीव प्रकर्षाने जाणवली. यामुळे भाविकांसह बंदोबस्तावरील पोलीस व होमगार्ड कर्मचार्‍यांची गैरसोय झाली.

 

The holy city of Trimbak was bustling with crowds of Shiva devotees.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

18 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

19 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

19 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

19 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

19 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

20 hours ago