राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

राज्यसभेत विरोधकांचा आक्रमक पवित्रा

कामकाज सोमवारपर्यंत तहकूब; विद्यार्थ्यांवर लाठीमारप्रकरणी मोदी-शहांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

नवी दिल्ली : प्रतिनिधी
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवल्याने राज्यसभेचे कामकाज शुक्रवारी सलग सहाव्या दिवशी विस्कळीत झाले. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज थेट सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी 20 जुलै विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि पेपरफुटी प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले. या प्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात येऊन स्पष्टीकरण द्यावे आणि विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणार्‍या पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी खर्गे यांनी लावून धरली. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले? असा सवाल उपस्थित करत खर्गे यांनी सरकारवर निशाणा साधला. या गदारोळातच केंद्र सरकारने ‘अँटी-पेपर लीक बिल’लोकसभेत मांडले. या विधेयकात पेपरफुटी प्रकरणी 10 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, विरोधी पक्षांनी या विषयावर आधी चर्चा करण्याची आणि अमित शाह यांनी निवेदन देण्याची मागणी कायम ठेवल्याने राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जला अमित शाह जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप खर्गे यांनी केल्यावर भाजप खासदारांनी जोरदार आक्षेप घेतला, ज्यामुळे सभागृहात गदारोळ वाढला आणि अखेर राज्यसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले.

Aggressive stance of opposition in Rajya Sabha

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago