नवी दिल्ली : प्रतिनिधी
लोकसभेत ‘अँटी-पेपर लीक बिलावर’ झालेल्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वापरलेल्या ‘इडियट आणि अंधभक्त’ या शब्दांवरून संसदेत मोठा गदारोळ झाला होता. या वादग्रस्त वक्तव्याची गंभीर दखल घेत भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे गांधी यांच्याविरुद्ध हक्कभंग आणि सभागृहाचा अवमान केल्याची नोटीस दाखल केली आहे. या नोटिशीत ठाकूर यांनी म्हटले आहे की, देशातील नागरिकांना ‘इडियट’ आणि ‘अंधभक्त’ संबोधून राहुल गांधींनी असंसदीय आणि अपमानास्पद भाषेचा वापर केला आहे (नियम 352 चे उल्लंघन), तसेच पूर्वसूचनेशिवाय गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत (नियम 353 चे उल्लंघन). ठाकूर यांनी या प्रकरणाची चौकशी हक्कभंग समितीकडे सोपवण्याची, आक्षेपार्ह शब्द कामकाजातून वगळण्याची आणि राहुल गांधींनी सभागृहाची तसेच गृहमंत्र्यांची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी केली
आहे.
संसदेतील भाषणात, एका विद्यार्थ्यासोबत झालेल्या संवादाचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी लोकांची तीन श्रेणींमध्ये विभागणी केली – ’विद्यार्थी’, ’इडियट’ आणि ’अंधभक्त’. अंधभक्त म्हणजे असा व्यक्ती ज्याची पूर्ण खात्री असते की दुसरा इडियट हाच देव आहे, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. या विधानाला सत्ताधारी बाकांवरून त्वरित आणि जोरदार विरोध झाला. संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी या शब्दांवर आक्षेप घेत ते संसदेच्या रेकॉर्डवरून काढून टाकण्याची मागणी केली आणि या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले. याशिवाय, राहुल गांधींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर पोलिसांना कारवाईचे आदेश दिल्याचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण मिळवल्याचा आरोपही केला होता.
Privilege motion against Rahul Gandhi
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…