‘जन्म-मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक’ चर्चेविना मंजूर
नवी दिल्ली : प्रतिनिधी
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या 10 व्या दिवशी शुक्रवारी विरोधी पक्षांच्या प्रचंड गदारोळात लोकसभेत ‘जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) विधेयक, 2026’ चर्चेविना संमत करण्यात आले. विरोधी सदस्यांच्या निदर्शनांमुळे आणि जोरदार घोषणाबाजीमुळे सभागृहात निर्माण झालेल्या गदारोळातच सरकारने हे महत्त्वाचे विधेयक मांडून ते मंजूर करून घेतले.
या नवीन सुधारणा विधेयकामध्ये जन्म आणि मृत्यूच्या विलंबाने होणार्या नोंदणीबाबतचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. जन्म व मृत्यूच्या नोंदी वेळेत व्हाव्यात, बनावट दाखल्यांना आळा बसावा आणि नागरिक नोंदणीची प्रक्रिया अधिक पारदर्शक व डिजिटल व्हावी, हा यामागील मुख्य उद्देश आहे. विलंबाने होणार्या नोंदींसाठी आता कडक पडताळणी प्रक्रियेतून जावे लागणार आहे. विरोधकांनी पोलिसांची कारवाई आणि इतर मुद्द्यांवरून लावलेल्या धरण आंदोलनामुळे या विधेयकावर सभागृहात सविस्तर चर्चा होऊ शकली नाही. मात्र, प्रशासकीय सुलभता आणि डिजिटल डेटाबेस अद्ययावत करण्यासाठी हे विधेयक आवश्यक असल्याचे सांगत सरकारने गदारोळातच हे विधेयक लोकसभेत संमत केले.
Opposition uproar in Lok Sabha
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…