नाशिक

पतीला टोलनाक्याजवळ उतरवून महिलेला माहेरी नेल्याचा आरोप

आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल

सिडको : प्रतिनिधी
महिलेच्या आई-वडिलांसह नातेवाइकांनी तिला तिच्या पतीच्या घरातून बळजबरीने घेऊन जात मारहाण केल्याचा, तसेच दुसरे लग्न लावून देण्यासाठी तिला नातेवाइकांच्या घरी डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आडगाव शिवारातील महालक्ष्मीनगर परिसरात तिच्या सासरी असताना तिची आई तेथे आली. ‘तुमच्या सासर्‍यांना अपोलो रुग्णालयात भेटायला जायचे आहे,’ असे सांगून आई, वडील, काका, मावशी आणि मामा यांनी महिलेला व तिच्या पतीला त्यांच्या वाहनात बसवून नेल्याचा आरोप आहे.
दरम्यान, शिंदे-पळसे टोलनाक्यापूर्वी महिलेच्या पतीला वाहनातून खाली उतरवून दिले. त्यानंतर महिलेला तिच्या मामाच्या नगरधन (ता. रामटेक, जि. नागपूर) येथील घरी नेण्यात आले.
तेथे आई-वडील आणि मामाने महिलेला मारहाण करून दुसरे लग्न लावून देण्याच्या उद्देशाने डांबून ठेवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस करीत आहेत. पोलिस उपनिरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार बहिरम करीत आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Allegation that a woman was taken to her maternal home after her husband was dropped off near a toll plaza.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

2 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

2 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 hours ago