नाशिक

नाशिकरोड विभागीय अधिकार्‍याच्या कारभाराचा पंचनामा

नगरसेवकांंच्या आरोपानंतर महापौरांचे बदलीचे आदेश

नाशिक : प्रतिनिधी
महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय अधिकारी डॉ. प्रज्ञा त्रिभुवन यांच्याकडून नगरसेवकांना मिळणार्‍या अवमानकारक वागणुकीचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित करत त्यांच्या कारभाराचा पंचनामा केला. सदस्यांच्या भावना पाहून महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी प्रशासनाला डॉ. त्रिभुवन यांच्या बदलीचे आदेश दिले. दरम्यान, त्रिभुवन यांच्या याआधीही तक्रारी आल्या असून, त्यांनी कामकाजात सुधारणा केली नाही, तर त्यांना प्रशासनाकडे पाठवण्यात येईल, असे महापौरांनी आदेश देताना म्हटले. तसेच नाशिकरोड विभागात पावत्यांबरोबरच गणेश विक्री स्टॉलमध्ये घोळ घालणारा लिपिक अमित पवार या कर्मचार्‍याच्याही चौकशीचे आदेश महापौरांनी दिले.
महासभा सुरू होताच रमेश धोंगडे यांनी, नाशिकरोडच्या विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन या मनमानी करत असून, सदस्यांना जुमानत नसल्याचे सांगितले. वादग्रस्त असलेला अमित पवार या कर्मचार्‍याला पाठीशी घालून अंदाधुंद कारभार नाशिकरोडला सुरू आहे. लोकप्रतिनिधींना जुमानत नसतील तर प्रभाग सभा घेऊन काय उपयोग? असा सवाल त्यांनी केला. यावेळी त्यांनी गणेशमूर्ती विक्रीसाठी 50 गाळ्यांंना परवानगी असताना प्रत्यक्षात 83 गाळे कसे उभारले? त्यामुळे उर्वरित रक्कम कुठे गेली, असा सवाल केला. अमित पवार हा मालमत्ता विभागातील कर्मचारी असल्याचे अतिक्रमण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, त्याची 18 तारखेला बदली झाल्यानंतरही 20 तारखेला झालेल्या गाळे लिलावात त्याचा सहभाग कसा, असा प्रश्न धोंगडे यांनी उपस्थित केला.
कैलास मुदलियार यांनी, अमित पवार व त्याच्या सोबतीला आनंद भालेराव नावाचा कर्मचारी हे दोघे नाशिकरोडमधून पैसे जमा करत असल्याचा आरोप केला. चायनीज गाड्यांवरून महिन्याला सात हजार, तर छोट्या टपरीधारकाकडून हजार रुपये जमा करून लुबाडणूक सुरू असल्याचा आरोप केला. दरम्यान, महापौरांनी घेतलेल्या निर्णयाचे नाशिकरोडमधील सर्व नगरसेवकांनी स्वागत केले.

उचलून नेलेल्या साहित्याची परस्परविक्री : मोरे
अतिक्रमण विभागातील अमित पवार अत्यंत मग्रुरीने वागत असल्याचे सतत दिसते. प्रभाग 18 मध्ये शेतकरी बांधव भाजीविक्रीसाठी बसतात. मात्र, त्यांच्याकडून जबरदस्तीने पावत्या घेण्याचे काम सुरू आहे. धक्कादायक म्हणजे नागरिकांचे साहित्य उचलून नेल्यानंतर संबंधित त्याची परस्परवक्री करत असल्याचा गंभीर आरोप शरद मोरे यांनी केला. याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली.

महापौर-शिवसेना उबाठाच्या गटनेत्यांत खडाजंगी
दरम्यान, महासभा सुरू होताच नाशिकरोडच्या सर्वपक्षीय सदस्यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर चर्चा घेण्यात आली. प्रभाग 18 चे नगरसेवक शरद मोरे बोलण्यासाठी उभे राहताच शिवसेना उबाठाचे गटनेते केशव पोरजे यांनी उभे राहत आक्षेप घेतला. तुम्हाला मृत माणसांबद्दल संवेदना नाहीत का, असा सवाल महापौरांनी केला. पोरजेंना महापौरांनी प्रत्युत्तर देत ही लक्षवेधी होऊ द्या, रस्ते विषयावर सविस्तर चर्चा होईल. सभागृहाचा अवमान करू नका, तुम्ही खाली बसा, अशा सूचना केल्या. माणूस मेला त्यावर बोला असे म्हणत, तुम्हाला काय कारवाई करायची करा, असे म्हटले. दरम्यान, नाशिकरोडचा विषय झाल्यानंतर रस्ते अपघातांचा विषय महापौरांनी सभागृहात घेतला.

पंचवटीतील अधिकार्‍यावरील गुन्हे का लपवताय?: बग्गा
पंचवटीतील विभागीय अधिकार्‍याचा पदभार चंदन घुगे यांच्या खांद्यावर देण्यात आला आहे. मात्र, याआधीचे विभागीय अधिकारी कुठे, असा सवाल ज्येष्ठ नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी केला असता, या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल असल्याचे समजले. त्यावेळी बग्गा यांनी प्रशासनावर आरोप करत विभागीय अधिकार्‍यावरील गुन्ह्याची माहिती प्रशासन का लपवत आहे, असा सवाल केला.

An assessment of the Nashik Road Divisional Officer’s functioning.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

7 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

7 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

7 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

7 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

7 hours ago