नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेसोबतच पर्यटन वैभवाची जगभर ओळख निर्माण करण्याची मोठी संधी आहे. या पाश्वर्र्भूमीवर कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिक-त्र्यंबकेश्वरची स्वतंत्र पर्यटन ओळख देशासह जागतिक पातळीवर पोेचविण्यासाठी व्यापक आणि प्रभावी माध्यम आराखडा तयार करावा, असे निर्देश माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी दिले.
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या सभागृहात माध्यम आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक डॉ. किशोर गांगुर्डे, अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, उपसंचालक डॉ. किरण मोघे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके आदी उपस्थित होते.
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे बारा वर्षांनंतर होणार्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने देश-विदेशातून येणार्या भाविक व पर्यटकांसमोर नाशिकचे सर्वंकष सादरीकरण करण्याची संधी आहे. गोदावरी नदी, प्रमुख तीर्थस्थळे, धार्मिक परंपरा, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा यासोबतच स्थानिक कला, खाद्यसंस्कृती आणि पर्यटनस्थळांची माहिती प्रभावीपणे पोहोचवावी. कुंभमेळा संपल्यानंतरही े पर्यटक आकर्षित होतील, अशा पद्धतीने शहराची पर्यटन ओळख निर्माण करण्यावर भर द्यावा, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली. पारंपरिक माध्यमांसोबतच डिजिटल माध्यमे, समाजमाध्यमे व दृकश्राव्य माध्यमांचा समन्वयित वापर करून कुंभमेळ्याचे जागतिक स्तरावर ब्रँडिंग करावे.
अफवांना तातडीने उत्तर
कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर चुकीची माहिती किंवा अफवा पसरल्यास त्याचे तातडीने खंडन करण्यासाठी प्रभावी माध्यम यंत्रणा उभारावी. अधिकृत माहिती नागरिकांपर्यंत जलदगतीने पोहोचविण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करावा, असे निर्देश देण्यात आले. त्यामुळे कुंभमेळ्याच्या प्रसिद्धीसोबतच माहितीच्या अचूकतेवरही प्रशासनाचा भर राहणार आहे. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या विविध विकासकामांची सविस्तर माहिती बैठकीत दिली. बैठकीनंतर महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी रामकुंड परिसराची पाहणी केली. भाविकांना उपलब्ध होणार्या सुविधा, प्रमुख स्थळांचे माध्यमीय सादरीकरण आणि प्रसिद्धीच्या दृष्टीने आवश्यक बाबींची त्यांनी माहिती घेतली. यावेळी पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत
कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वरसह जिल्ह्यात सुरू असलेल्या दीर्घकालीन पायाभूत सुविधा आणि विविध विकासकामांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर द्यावा. विकासकामांची सद्यःस्थिती, भाविकांसाठी होणार्या सुविधा आणि कुंभमेळ्यासाठीची प्रशासकीय तयारी याबाबत सातत्याने माहिती देण्याचे नियोजन करावे, अशा सूचना ब्रिजेश सिंह यांनी दिल्या.
Establish Nashik’s global identity through the Kumbh Mela: Brijesh Singh
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…