आस्वाद

अर्ध्यावरचा डाव

– अ‍ॅड. प्रतीक्षा चौधरी

पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या मैत्रिणीचा म्हणजे श्रद्धाचा वाढदिवस करण्यासाठी आम्ही सगळे जमणार होतो. सगळ्या छान तयार होऊन आम्ही एक ठिकाणी जमलो. खूप दिवसांनी भेटलेला आहे उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. मग काय तिचा वाढदिवस आहे, तिचं छानसं आम्ही फोटोसेशन सुरू केलं. मैत्रिणी म्हटल्या की दंगा मस्करी यात मुरलेलं आणि शहरात राहतोय म्हटल्यावर विविध ठिकाणी विविध लोक भेटणारच आणि त्यात जोडपी तर सहजच बघायला मिळतात. तुम्ही कुठेही जा आम्ही ज्या ठिकाणी बसलो होतो, तेथे एक जोडपं बसलेलं होतं. दोघेही अगदी कमी वयाचे. पहिल्या नजरेत आम्ही हेच हेरलं की हेच ते टाइमपास करत फिरणारे मुलं-मुली असणार. परंतु मुलीच्या डोळ्यात सारखे अश्रू होते आणि त्याचं कारण आम्ही मैत्रिणींनी अंदाजे यांचा ब्रेकअप झाला असावा किंवा यांच्याकडून काही चूक झाली असावी असं वाटलं. अगदी मस्करीत घेऊन सोडून दिला आणि चहा ऑर्डर केला. न राहून माझी मैत्रीण शीतल हिने ते दोघेही बॅचलर आणि अल्लड असल्याने शेवटी त्या मुलाला विचारलंच का रडवतो आहेस रे दादा तू तिला…? उत्तर अगदी सुन्न करणारं होतं, मला ब्लड कॅन्सर आहे आणि हे तिला आता दहा मिनिटांपूर्वी समजले.
मस्ती मस्करीतला आमचा सोहळा दोन मिनिटांत अगदी गंभीर झाला. नकळत आमच्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. फक्त 20/ 21 वर्षांचा तो मुलगा आणि त्याला हे कळून चुकलं होतं की फक्त पुढची सात वर्षे त्याच्या हातात आहेत. गोष्ट अगदी आबा करणारी होती. मी आशा गोष्टी फक्त फिल्म वेब सरीज किंवा स्टोरी वाचताना पाहिलं होतं. मला कधीच असं वाटलं नव्हतं की अशा घटना कधी समोरही येऊ शकतात आणि दोघांनीही सोबतच राहायचं स्वप्न, भविष्य रंगवलेले असेल याचा विचार खरंतर खूप त्रासदायक होता, पण तरीसुद्धा धीर धरून आम्ही त्या दोघांना शुभेच्छा दिल्या की, तू या आजारातून बरा होशील आणि नक्कीच तुमचं प्रेमही टिकेल.
या दोघांकडे बघून ना एक गोष्ट पण मनाला लागून गेली, आम्ही सर्व मैत्रिणी त्या दिवशी सहज एका विषयावर चर्चा करून गेलो की आपण किती गोष्टींचे प्लॅनिंग करून ठेवतो. किती गोष्टींचा विचार करतो पण आयुष्य एकदा अशा वळणावर येतं की सगळं आपल्या हातातून जाणार आहे माहीत असूनही आपल्याला जगावर लागतं. त्यामुळे आलेला प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस भरभरून जगून घेतला पाहिजे. गेल्या काही दिवसांत प्रेमप्रकरणात ज्या काही हत्या घडत आहेत, आत्महत्या घडत आहेत त्यावरून प्रेम या विषयाकडे बघण्याचा आपला कल खूप बदललाय. प्रेम म्हटलं की युवा पिढी तरी नुसता टाइमपासच करते. नुसते शारीरिक सुखच घेण्यासाठी हे एकमेकांसोबत राहतात, फिरतात. अशा अनेक कल्पना आपण मनात करून घेतल्या आहेत.
पण सत्य परिस्थिती आजही अशी आहे, काही मुलं-मुली हे खरंच प्रेम करतात. एकमेकांसाठी आपल्या आयुष्याच्या सगळ्या वाटा वाहून देतात. एकमेकांना आपल्या सर्वस्व समजतात आणि असा भावनिक नातं मिळायला खरंच नशीब लागतात. माझ्या आयुष्यातली मी बघितलेली ही प्रेम कहाणी मला सगळ्यात सुंदर आणि आवडलेली. कारण मी आत्तापर्यंत फक्त वाचला होता आणि बघितलं होतं पण अशा कथा यासमोर एखाद्याच्या आयुष्यात घडू शकता याचा मी विचारही केला नव्हता आणि त्यामुळे माझ्या मैत्रिणी कल्याणी मंगल मावशी शीतल, श्रद्धा यांनी मला यांच्यावर लेख लिहायला सांगितला आणि मला तो लिहावा असा वाटला आवर्जून, कारण खरंच आहे खरं प्रेम हे नशिबानेच मिळतं पण नशिबाने साथ दिली तरच ते आयुष्यभर पुरतं.

An Unfinished Innings

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

13 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

13 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

13 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

13 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

13 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

13 hours ago