भिवंडी/शहापूर : प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे बालाजीनगर भागातील कोहिनूर ही चार मजली इमारत कोसळल्याची भीषण घटना घडली. या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी रात्री 8 ते 9 च्या सुमारास या इमारतीतून मोठ्या प्रमाणात तडे जाण्याचे आणि खचण्याचे आवाज येऊ लागले होते. त्यानंतर काही वेळातच ही संपूर्ण इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. या ढिगार्याखाली अडकलेल्या 10 नागरिकांना जीव गमवावा लागला. प्रशासनाकडून शुक्रवारी सायंकाळपर्यंत बचावकार्य सुरू होते. दरम्यान, प्रशासनाने ही इमारत राहण्यास अयोग्य घोषित केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त इमारत चार मजली होती आणि त्यामध्ये एकूण 48 खोल्या होत्या. धक्कादायक बाब म्हणजे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेने यापूर्वीच ही इमारत राहण्यास अयोग्य आणि अतिधोकादायक घोषित केली होती. जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीची दुरुस्ती करणेही शक्य नव्हते. असे असतानाही येथे नागरिक वास्तव्य करत होते. या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेत इमारतीचा मालक आणि कंत्राटदार आता प्रशासनाच्या रडारवर असून, त्यांच्यावर कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
धोकादायक इमारती त्वरित
रिकाम्या करण्याचे आदेश
या भीषण दुर्घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. भिवंडी आणि परिसरातील सर्वधोकादायक आणि राहण्यास अयोग्य असलेल्या इमारती त्वरित रिकाम्या करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. जर नागरिक स्वतःहून अशा इमारती खाली करत नसतील, तर प्रसंगी पोलीस बळाचा वापर करून या इमारती रिकाम्या कराव्यात, जेणेकरून भविष्यात अशा निष्पाप लोकांचे बळी जाणार नाहीत, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
ढिगार्याखाली अनेक तास जिवंत
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि एनडीआरएफच्या तुकड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. ढिगारा उपसण्याचे काम अविरत दुसर्या दिवशीही सुरू होते. बचावलेल्या नागरिकांनी सांगितलेले अनुभव अत्यंत हृदयद्रावक आहेत. आम्ही ढिगार्याखाली अनेक तास जिवंत गाडले गेलो होतो, तसेच आईच्या रडण्याचा आणि किंकाळ्यांचा आवाज मला सतत ऐकू येत होता, अशा अंगावर काटा आणणार्या प्रतिक्रिया बचावलेल्यांनी दिल्या आहेत. काँक्रीटच्या ढिगार्याखाली जीव अडकले असण्याची शक्यता असल्याने अत्यंत काळजीपूर्वक आणि यंत्रांच्या सहाय्याने बचावकार्य केले गेले. शेवटी, कुणीही नागरिक ढिगार्याखाली नसल्याची खात्री करून यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ढिगारा उपसला गेला.
10 killed in building collapse in Bhiwandi
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…