नाशिक

मालेगावला उड्डाणपूल विस्तारास मंजुरी

महासभेत विविध 31 विषयांवर पाच तास विनागोंधळ चर्चा

मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव महानगरपालिकेची महासभा महापौर नसरीन शेख यांच्या अध्यक्षतेखाली मनपा सभागृहात पार पडली. महासभेस आयुक्त रवींद्र जाधव, उपमहापौर शान-ए-हिंद, नगरसचिव साजिद अहमद यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. प्रारंभी 31 विषयांवर चर्चा करण्यात आली.
जुना आग्रा रोडवरील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता विद्यमान उड्डाणपुलाची लांबी वाढविण्याची गरज असल्याचे नगरसेवक हाजी खालिद शेख यांनी मांडले. सखावत हॉटेल ते नॅशनल पेट्रोलपंप या दरम्यान उड्डाणपूल विस्ताराचा प्रस्ताव सभागृहाने मंजूर केला.
यानंतर विविध 31 विषयांवर सुमारे पाच तास विनागोंधळ चर्चा होऊन सर्व प्रस्ताव खेळीमेळीच्या वातावरणात मंजूर करण्यात आले. दरम्यान, शिवसेनेचे गटनेते नीलेश आहेर यांनी कॅम्प रोडवरील अपर पोलिस अधीक्षक निवासस्थान ते महात्मा फुले पुतळा आणि सुजन थिएटरपर्यंत नवीन उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने दोन अन्न व औषध निरीक्षकांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती सभापती एजाज बेग यांनी मांडला. हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यास मंजुरी देण्यात आली.
तसेच पवारवाडी येथे अग्निशमन केंद्र उभारणे, मनपा कार्यालयात सौरऊर्जा प्रणाली बसविणे, रमजानपुरा येथे प्रसूतीगृह सुरू करणे, अपूर्ण पाणीटाकीचे काम पूर्ण करणे, बांधकाम परवानग्या तीन महिन्यांत देणे, तसेच नगरोत्थान योजनेंतर्गत रस्ते विकास व प्रवेशद्वार उभारणी यांसह विविध महत्त्वाच्या विषयांना सभागृहाची मंजुरी मिळाली.

प्रस्तावांना खेळीमेळीच्या वातावरणात मंजुरी
अन्न व औषध निरीक्षकांची नियुक्ती
पवारवाडीत अग्निशमन केंद्र उभारणार
नगरोत्थान योजनेंतर्गत रस्ते विकास, प्रवेशद्वार
सभागृहात पत्रकारांना वार्तांकनात अडथळे

निषेध नोंदवत पत्रकारांचा ठिय्या

सभागृहाच्या वरच्या मजल्यावरील पत्रकार कक्षातील मूलभूत सुविधांच्या अभावाबाबत पत्रकारांनी निषेध नोंदवत ठिय्या आंदोलन केले. कक्षात पंखा किंवा वातानुकूलन व्यवस्था नसल्याने उकाड्यात काम करणे कठीण होत असल्याची तक्रार त्यांनी केली. तसेच पूर्णतः काचांनी बंदिस्त कक्षात सभागृहातील आवाज स्पष्टपणे ऐकू न आल्याने वार्तांकनात अडथळे येत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. बाहेरील नागरिकांची कक्षात होणारी घुसखोरी रोखावी, अशी मागणीही पत्रकारांनी केली.

Approval for Malegaon flyover expansion

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

डाळिंबबागेने नेसला ‘पांढरा शालू’

सिन्नर : प्रतिनिधी एप्रिल महिन्यातच उन्हाचा कडाका वाढल्याने सिन्नर तालुक्यातील तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले…

4 days ago

शासकीय जमिनीवरील घरे होणार अधिकृत

निफाड उपविभागीय अधिकार्‍यांचे नगरपालिकांना आदेश सिन्नर : प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, ओझर, सिन्नर आणि…

4 days ago

आदिवासी भागातील डोंगरदर्‍यांत बहरताहेत करवंदे

इगतपुरी तालुक्यात आदिवासी बांधवांना मिळतोय रोजगार इगतपुरी : प्रतिनिधी तालुक्यातील डोंगरदर्‍या परिसरातील आदिवासी भागातील “डोंगरची…

4 days ago

बिबट्याने वर्षभरात 6 बळी घेऊनही वन विभाग सुस्त

ग्रामस्थांचा संताप; बिबट्याच्या संख्येत झपाट्याने वाढ दिंडोरी : अशोक केंग तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांनी नागरिक दहशतीखाली…

4 days ago

दैवी शक्तीच्या नावाखाली महिलेचे लैंगिक शोषण

भोंदूबाबावर गुन्हा दाखल निफाड /लासलगाव : वार्ताहर घरगुती ताणतणाव, वैवाहिक अडचणी आणि मानसिक अस्वस्थतेचा गैरफायदा…

4 days ago

पंचायत राज : तळागाळातील लोकशाहीचा पाया

भारतीय संस्कृतीच्या पायाभूत रचनेत ‘ग्राम’ ही संकल्पना केंद्रस्थानी आहे. प्राचीन काळापासून गाव हे सामाजिक, आर्थिक…

4 days ago