नाशिक

पंढरपूरच्या विशेष पुनर्वसन धोरणाला मंजुरी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय

मुंबई : प्रतिनिधी
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विकास प्रकल्पांसह पायाभूत सुविधा, सिंचन, क्रीडा, पुनर्वसन, वित्तीय सुधारणा आणि औद्योगिक क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली. पंढरपूर येथील विशेष पुनर्वसन धोरणापासून ते जायकवाडी प्रकल्पाच्या दुसर्‍या टप्प्यासाठी हजारो कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीपर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले.
श्री क्षेत्र पंढरपूर येथील विशेष पुनर्वसन धोरणाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर आणि वाणिज्य संकुलाच्या विकास आराखड्यातील 3 हजार 993 कोटी 90 लाख रुपयांच्या कामांना गती मिळणार आहे. पंढरपूरचे धार्मिक आणि पारंपरिक महत्त्व, वारकरी भाविकांची वाढती संख्या, स्थानिक परिस्थिती आणि प्रकल्पाची तातडीची गरज लक्षात घेऊन हे धोरण तयार करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष पॅकेज तयार करण्यात आले असून, जिल्हा प्रशासनाने त्यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला होता. सार्वजनिक बांधकाम विभागात ट्रेड्स प्लॅटफॉर्म प्रणालीचा वापर करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच कंत्राटदारांची प्रलंबितदेयके वेळेत देणे अधिक सुलभ होणार आहे.

Approval for Pandharpur’s special rehabilitation policy

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

16 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

16 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

16 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

16 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

16 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

17 hours ago