नाशिक

लैंगिक शोषण प्रकरणातील संशयित एरंडेची कोठडी संपणार

पुन्हा कोठडीची मागणी होण्याची शक्यता

सिडको : प्रतिनिधी
सातपूर परिसरात लैंगिक शोषण व फसवणुकीच्या गंभीर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयिताची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपत असून, आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तपासात सहकार्य न
केल्याने पोलिसांकडून पुन्हा कोठडीची मागणी होण्याची
शक्यता आहे.
सातपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या लैंगिक शोषण व फसवणूक प्रकरणातील संशयित आरोपी रवींद्र नारायण एरंडे (वय 63, रा. नीलकंठेश्वरनगर, अशोकनगर, सातपूर) याची दोन दिवसांची पोलीस कोठडी आज संपत आहे. त्यामुळे त्याला आज जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पोलीस पुन्हा कोठडीची मागणी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने गरजू महिलांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार दाखल झाली होती. तसेच संबंधित महिलांचे व्हिडिओ चित्रीकरण करून त्यांना ब्लॅकमेल करत त्यांची फसवणूक केल्याचाही आरोप आहे.
या प्रकरणात तपासादरम्यान संशयिताकडून सुमारे 100 हून अधिक महिलांशी संबंधित व्हिडिओ असलेला पेन ड्राइव्ह, डीव्हीआर जप्त करण्यात
आल्याने मोठी खळबळ
उडाली होती.
या प्रकरणात आणखी पीडित महिलांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. न्यायालयाने यापूर्वी संशयिताला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, तपासादरम्यान संशयिताकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने पोलिसांकडून त्याची पोलीस कोठडी वाढविण्याची मागणी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली
जात आहे.

Arande, a suspect in the sexual abuse case, will be released from custody.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

7 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

13 minutes ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

19 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

24 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

39 minutes ago

लैंगिक अत्याचार करणार्‍या दोघा फरार आरोपींना अटक

सातपूर : प्रतिनिधी पीडित तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन मॅक्स कॅफे तसेच आई-वडील घरी नसताना…

46 minutes ago