नाशिक

मध्यरात्री 1 वाजेपर्यंत जलवाहिनी दुरुस्ती

मुख्य जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा होता बंद; रविवारपासून सिन्नरचा पाणीपुरवठा सुरू

सिन्नर : प्रतिनिधी
हरसुले शिवारात सिन्नर नगरपरिषदेची मुख्य जलवाहिनी फुटल्याने शनिवारी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. सायंकाळपासून सुरू असलेले दुरुस्तीचे काम मध्यरात्री एक वाजेपर्यंत चालले. त्यानंतर रविवारी सकाळी जलवाहिनीची तपासणी करून सकाळी दहा वाजेच्या सुमारास शहरातील जलकुंभ भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

हरसुले फाटा परिसरात सीएनजी गॅस लाइन टाकण्यासाठी खोदकाम सुरू असताना ही जलवाहिनी फुटली. या घटनेत हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. सुदैवाने हा प्रकार वेळेत लक्षात आल्याने तातडीने पाणीपुरवठा बंद करण्यात आला. मात्र, या घटनेमुळे शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन एक दिवस पुढे ढकलावे लागले. नगरपालिका प्रशासनाने नागरिकांना त्याबाबत पूर्वसूचना देत सहकार्याचे आवाहन केले होते.
घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष विठ्ठल उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख आणि पाणीपुरवठा समितीचे सभापती पंकज मोरे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. गॅस लाइन टाकण्यासाठी खोदकाम करणार्‍या संबंधित कंपनीला त्यांनी धारेवर धरले. त्यानंतर कंपनीकडून दुरुस्तीच्या कामात सहकार्य करण्यात आले.
सायंकाळी सुरू झालेले दुरुस्तीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. सुरुवातीला रात्री दहा वाजेपर्यंत काम पूर्ण होईल, असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात काम पूर्ण होण्यासाठी मध्यरात्री एक वाजता एवढ्या उशिरा चाचणी घेणे शक्य नसल्याने रविवारी सकाळी टेस्टिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. सकाळी तपासणी पूर्ण झाल्यानंतर शहरातील जलकुंभ भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

उपनगराध्यक्ष मध्यरात्रीपर्यंत घटनास्थळी

उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख हे दुरुस्तीचे काम सुरू झाल्यानंतर ते पूर्ण होईपर्यंत प्रत्यक्ष फिल्डवर उपस्थित होते. काम पूर्ण झाल्यानंतर ते घरी गेले. त्यानंतर रविवारी सकाळी पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचार्‍यांसोबत टेस्टिंग करून शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.

Water main repair until 1 am

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

48 minutes ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

55 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

1 hour ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

1 hour ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

1 hour ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

1 hour ago