नाशिक

जि.प.साठी सेनेकडून संघटन मजबुतीवर भर

मंत्री सामंत : नाशिक, दिंडोरी लोकसभेचा घेतला आढावा

नाशिक : प्रतिनिधी
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या द़ृष्टीने नाशिक जिल्ह्यात जास्तीत जास्त जिल्हा परिषदेच्या जागा निवडून आणून जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकेल. यासाठी गट, गटनिहायप्रमाणे पक्षाच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत शिवसेना पोचवून शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करावे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे नाशिक जिल्ह्याचे संपर्कमंत्री उदय सामंत यांनी येथे केले.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संपर्कमंत्री सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि.6) नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला.
दरम्यान, त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री सामंत यांनी पक्षाची भूमिका मांडत विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हा संपर्कप्रमुख सुहास कांदे, उपनेते अजय बोरस्ते, विजय करंजकर, भाऊलाल तांबडे, अनिल ढिकले, उपमहापौर विलास शिंदे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे आदी उपस्थित होते.
यावेळी सामंत म्हणाले, की जिल्हा परिषद निवडणुकीत महायुती करण्याला आमचे प्राधान्य असेल. मात्र, महायुतीतील प्रत्येक पक्षाला त्याची ताकद वाढवण्याचा अधिकार आहे. त्यानुसारच आम्ही जिल्ह्यात संघटन जास्तीत जास्त प्रमाणात वाढवणार आहोत. त्याकरिता प्रभागनिहाय, तालुकानिहाय माहिती पदाधिकार्‍यांकडून घेतली. संपर्कमंत्री म्हणून नाशिकची जबाबदारी आपल्याकडे आहे. महायुतीत समन्वय समिती असून, त्यासाठी तीनही पक्षांचे प्रमुख आहेत. लाडकी बहिणींना लवकरच पैसे मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षात कोणतीही गटबाजी नसल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, शिवसेनेने नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेऊन आगामी जिल्हा परिषद ते पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचे दाखवून दिले आहे.

पक्षात गट-तट नाही
पक्षात कुठलेही गट-तट नाही. येत्या निवडणुकीला आम्ही एकसंघपणे सामोरे जाणार आहोत. निवडून आलेल्या नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहोत. याशिवाय पराभूत उमेदवारांचीदेखील संयुक्त बैठक घेतली जाणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

निधीसाठी कुठलीही अडचण नाही
नाशिक महापालिकेत निवडून आलेल्या शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कोणाही नगरसेवकाला निधीची अडचण येणार नाही. मुळात ज्या खात्यांतर्गत निधी दिला जातो ते खाते शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.

हिंदीसक्तीविषयी माहिती नाही
राज्य शासनाने शासकीय कर्मचारी आणि अधिकार्‍यांसाठी हिंदीसक्तीचा निर्णय घेतल्याच्या प्रश्नी मंत्री सामंत यांना विचारले असता, त्यांनी याबाबत आपल्याला माहिती नसून, माध्यमांतूनच यासंदर्भात समजले आहे. याप्रश्नी भाषा संचालनालयाशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चौदा हजार कोटींची गुंतवणूक
नाशिकमध्ये तीन वर्षांपूर्वी 14 हजार कोटींची गुंतवणूक केली होती. 142 सामंजस्य करार केले होते. दरम्यान, नाशिकमध्ये महिंद्रा समूह गुंतवणूक करणार असल्याने यामुळे दहा ते पंधरा हजार रोजगार उपलब्ध होतील, असे त्यांनी म्हटले आहे.

महापालिकेतल्या चुका टाळू
नाशिक महापालिका निवडणुकीत आमच्याकडून ज्या चुका झाल्या त्या आम्ही टाळण्याचा प्रयत्न करू. जिल्हा परिषदेवर जास्तीत जास्त आमचे उमेदवार कसे निवडून जातील यासाठीच नियोजन असेल.

Army focuses on organizational strength for Z.P.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago