नाशिक

सिंहस्थाच्या तोंडावर अधिकार्‍यांना स्वेच्छानिवृत्ती नको

उपमहापौर शिंदेंचे आयुक्तांना पत्र

नाशिक : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळा पाहता महापालिकेत अपुरे मनुष्यबळ असल्याने प्रशासनाने अधिकार्‍यांची स्वेच्छानिवृत्ती मंजूर करू नये, अशी मागणी उपमहापौर विलास शिंदे यांनी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पंचवटी विभागीय कार्यालयातील उपअभियंता समीर रकटे यांनी प्रशासन विभागाकडे अर्ज सादर केला आहे. यासह इतरही काही अधिकारी स्वेच्छानिवृत्तीच्या मनःस्थितीत आहेत. याअनुषंगाने उपमहापौरांनी स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज मंजूर करू नयेत, अशी मागणी केली आहे.
उपमहापौर शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे की, नाशिक येथे आगामी वर्षात सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे. हा कुंभमेळा केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर प्रशासकीय, सामाजिक व आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आणि व्यापक स्वरूपाचा आहे. देश-विदेशातून कोट्यवधी भाविक या कालावधीत नाशिक शहरात आगमन करणार असल्याने शहरातील पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, स्वच्छता, आरोग्यसेवा, सुरक्षाव्यवस्था तसेच आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या अनेक घटकांचे अत्यंत सूक्ष्म व प्रभावी नियोजन करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेत सध्या अधिकारी वर्गाची संख्या अत्यंत मर्यादित आहे. विशेषत: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी आवश्यक असलेले अनुभवी व कुशल अधिकारी अत्यल्प प्रमाणात उपलब्ध आहेत. या काही मोजक्या अधिकार्‍यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण सिंहस्थ नियोजन करण्यात येत आहे.
अशा परिस्थितीत काही अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. जर या अधिकार्‍यांची स्वेच्छानिवृत्ती मंजूर करण्यात आली, तर आधीच अपुरी असलेली मनुष्यबळाची स्थिती अधिक गंभीर बनेल व परिणामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन कोलमडण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी भीती उपमहापौर विलास शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून पुढील उपाययोजना करण्यात याव्यात, अशी सूचना करत सिंहस्थ कुंभमेळा होईपर्यंत स्वेच्छानिवृत्ती अर्ज सादर करणार्‍या अधिकार्‍यांची स्वेच्छानिवृत्ती मंजूर करण्यात येऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Officers should not take voluntary retirement in the face of Simhastha

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago