केंद्राचे पाऊल : हवाईदल करणार प्रश्नपत्रिकांची सुरक्षित वाहतूक

नवी दिल्ली : प्रतिनिधी
वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘नीट’ परीक्षा पूर्णपणे दोषमुक्त करण्यासाठी आणि पेपरफुटीच्या घटनांना कायमचा आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव आणला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरात नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका अत्यंत सुरक्षितपणे आणि वेळेत पोहोचवण्यासाठी आता भारतीय हवाईदलाची मदत घेतली जाणार आहे. परीक्षा प्रक्रियेतील सर्व प्रकारच्या त्रुटी शून्य करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात येत आहे.

मजबूत लॉजिस्टिक्स आणि सुरक्षा व्यवस्था या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय यांच्यात उच्चस्तरीय चर्चा झाली आहे. प्रश्नपत्रिकांची वाहतूक पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यासाठी हवाईदलाच्या पायाभूत सुविधांचा आणि त्यांच्या कडक सुरक्षा प्रोटोकॉलचा वापर करण्यावर या चर्चेत विशेष भर देण्यात
आला आहे.
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निर्देशानुसार, आगामी ‘री-नीट’ परीक्षांसाठी अत्यंत कडक सुरक्षा प्रोटोकॉल आणि विशेष दक्षता लागू करण्यात आली आहे. यासोबतच, विद्यार्थ्यांनापरीक्षा केंद्रांवर जाण्यासाठी योग्य वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे आणि केंद्रांवर आवश्यक सुविधा पुरवणे याबाबी सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना अधिकृत विनंती केली आहे.
परीक्षा ‘सीबीटी’ मोडवर होणार
पेपर फुटीचा धोका मुळापासून उपटून टाकण्यासाठी सरकारने एक मोठा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यानुसार, पुढील वर्षापासून (2027) नीट परीक्षा ही पेन-पेपर पद्धतीऐवजी संगणक आधारित चाचणी म्हणजेच ’कंप्युटर बेस्ड टेस्ट’ (सीबीटी) पद्धतीने घेतली जाईल. या डिजिटल ट्रान्झिशनमुळे पेपर लीक होण्याचा धोका पूर्णपणे संपुष्टात येईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ’नीट’ परीक्षेचे पेपर सुरक्षित आणि जलद पोहोचवण्यासाठी ’एअर फोर्स’ची मदत घेण्याचा विचार सुरू असल्याचे अधिकृतपणे मान्य केले आहे. या निर्णयानंतर काँग्रेस तसेच विद्यार्थी नेत्यांनी शिक्षण व्यवस्थेच्या अपयशावर बोट ठेवत सरकारवर सडकून टीका केली आहे. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडीत असणारी नीट परीक्षा सुरक्षितपणे पार पाडण्याची कुवत शिक्षण विभागाकडे उरलेली नाही. पेपर सुरक्षित पोहोचवण्यासाठी थेट लष्करी यंत्रणेची (एअर फोर्स) मदत घ्यावी लागणे, हे केंद्र सरकारचे आणि शिक्षण विभागाचे सर्वांत मोठे प्रशासकीय अपयश आहे, अशी जोरदार टीका सपकाळ यांनी केली आहे.

प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

विद्यार्थी नेते कन्हय्या कुमार यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांना ’अकार्यक्षम शिक्षणमंत्री’ म्हटले असून, पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी केली आहे. शिक्षण यंत्रणेचा संपूर्ण बोजवारा उडालेला असताना आणि साधी परीक्षा घेण्यासाठी आता एअरफोर्सची मदत घेण्याची नामुष्की ओढवली असताना, शिक्षणमंत्र्यांना या सर्व प्रकाराची लाज वाटत नाही का? असा बोचरा सवाल कन्हय्या कुमार यांनी उपस्थित करत केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा

पेपरफुटीमुळे आधीच विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षांचा चुराडा झाला असून, कुचकामी कारभारामुळे गुन्हेगारांना अभय मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी प्रशासकीय जबाबदारी निश्चित करून ’एनटीए’च्या महासंचालकांवर कारवाई करण्याची मागणीही सपकाळ यांनी केली आहे.

Army in the field for ‘NEET’

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

3 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

3 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

3 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

3 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

4 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

4 hours ago