राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

पंजाबच्या निर्णयाअभावी रखडला केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार?

सर्व मंत्र्यांसोबत साडेतीन तास मंथनानंतर मोदी-शहा-नितीन नवीन यांच्यात दीड तास बैठक

नवी दिल्ली । प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाच्या चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत. बुधवारी, मोदी यांनी प्रथम भारत मंडपम येथे संपूर्ण मंत्रिपरिषदेची साडेतीन तास बैठक घेतली. त्यानंतर रात्री त्यांच्या निवासस्थानी गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि संघटन महामंत्री बी. एल. संतोष यांच्यासोबत सुमारे दीड तास हायलेव्हल बैठक झाली. या दोन बैठकांमुळे दिल्लीत मंत्रिमंडळ फेरबदलाच्या अटकळींना पुन्हा उधाण आले आहे. मात्र, सरकारकडून याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. विशेष म्हणजे, पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी अकाली दलासोबत युती करायची की नाही, याचा निर्णय होईपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.
बुधवारच्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मोदी यांनी मंत्र्यांच्या कामाचे रिपोर्ट कार्ड घेतले. सप्टेंबरमधील चिंतन शिबिरात दिलेली उद्दिष्टे किती पूर्ण झाली, याचा आढावा घेतला. गरिबी निर्मूलन, नक्षलमुक्त भारत आणि जनधनद्वारे आर्थिक सक्षमीकरण यावर तीन सादरीकरणे झाली. गृह, वित्त यासह 11 मंत्रालयांच्या सचिवांनी सादरीकरणे केली. मोदी यांनी योजनांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला. त्यानंतर रात्रीच्या बैठकीत आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका, संसदेचे विशेष अधिवेशन, मध्य प्रदेशातील राजकीय स्थिती आणि मंत्रिमंडळ विस्तारावर मंथन झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

मंत्रिपरिषदेत 13 जागा रिकाम्या
सध्या मंत्रिपरिषदेत 68 सदस्य आहेत आणि 13 जागा रिकाम्या आहेत. जून ते ऑक्टोबर दरम्यान 4 मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे, पूर्णवेळ शिक्षणमंत्री अद्याप नेमलेला नाही. पंजाबचे मंत्रिमंडळात सध्या प्रतिनिधित्व नाही. रवनीत बिट्टू यांचा राज्यसभा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना पुन्हा संधी मिळाली नाही. त्यामुळे पंजाबमधील नेत्यांना, मग ते भाजपचे असोत किंवा अकाली दलाचे, मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

Has the Union Cabinet expansion been stalled due to the lack of a decision from Punjab?

 

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

फळविक्रीचा गाडा सुरू ठेवण्यासाठी मागितली खंडणी

चाकूहल्ल्यात विक्रेता जखमी सिडको : प्रतिनिधी म्हसरूळ परिसरातील मेहेरधाम बसथांब्याजवळ फळविक्रीचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी दोघांनी…

20 minutes ago

पंचवटीत महाविद्यालयीन युवकाची निघृण हत्या

पूवर्र्वैमनस्यातून हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पंचवटी : प्रतिनिधी शहरातील पंचवटी परिसरात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा डोके…

24 minutes ago

प्रशिक्षणासाठी जाणार्‍या प्राध्यापकाचा हृदयविकाराने मृत्यू

रुग्णालयातून परतणार्‍या सहकार्‍यांचाही अपघात नांदगाव : प्रतिनिधी वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी येणार्‍या प्राध्यापकाचा हृदयविकारा-च्या तीव्र…

51 minutes ago

कार्तिकी यात्रेसाठी पंढरी गजबजली

चार लाख भाविकांची मांदियाळी; उपमुख्यमंत्री शिंदे करणार महापूजा सोलापूर : सूर्यकांत आसबे दक्षिण काशी म्हणून…

59 minutes ago

मक्तेदारीमुळे नोकर्‍या नाहीत, महागाई वाढतेय!

फिक्कीतील भाषणावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल नवी दिल्ली : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…

1 hour ago

’स्वीकृत’च्या वादात भाजपा शहराध्यक्षांची विकेट!

सुनील केदार यांचा राजीनामा घेतल्याचे वृत्त; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची कारवाई; पक्षशिस्तभंगाचा ठपका नाशिक :…

1 hour ago