नारपार साठी आता आरपारची लढाई नारपार जलहक्क समितीच्या बैठकीत निर्णय
मनमाड : अमिन शेख
सुरुवातीपासून दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या तसेच कायम दुष्काळ पाचवीला पुजलेल्या नांदगाव तालुक्यावर राज्य व केंद्र शासन देखील कायम अन्याय करत आले आहे खास करून मनमाड शहर व आजूबाजूच्या गावांवर मोठ्या प्रमाणावर कायम अन्याय झालेला आहे नांदगाव तालुक्यात मंजूर झालेले प्रांत कार्यालय जिल्हा न्यायालय यासह दुष्काळ असताना देखील तालुक्यात दुष्काळ जाहीर केला नाही यासह मांजर पाडा व आता नारपार नदीजोड प्रकल्पात देखील नांदगाव तालुक्याचा समावेश केलेला नाही यामुळे या अन्याय विरोधात तसेच राज्य व केंद्र शासनाचे विरोधात नांदगाव तालुक्यातील संपूर्ण जनता व सर्वपक्षीय नेते आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून नारपार नदीवर प्रकल्पात नांदगाव तालुक्याचा समावेश व्हावा यासाठी आता आरपारची लढाई लढतील असा एक मुखी ठराव नारपार जल हक्क समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आला शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करून नारपारसाठी आता आरपारची लढाई लढण्याची भूमिका घेतली आहे
या बैठकीला दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे हेदेखील उपस्थित होते यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून नारपार नदीवर प्रकल्पात दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील अनेक तालुक्याचा समावेश नाही यामुळे शासनाच्या दरबारी मी भांडण करेल व नारपार नदीजोड प्रकल्पाच्या डी पी आर मध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उरलेल्या तालुक्यांचा समावेश करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारला भाग पाडेल तुम्ही लढा मी सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन दिले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदगाव विधानसभा अध्यक्ष विनोद शेलार यांनी कोणताही लढा लढण्यासाठी व कोणती योजना आपल्या पदरी पाडण्यासाठी शासन दरबारी आपली बाजू मांडण्यासाठी राजकीय पक्ष मग तो कोणताही असो त्यांची गरज आपल्याला लागणार आहे राजकीय नेत्यांच्या मदतीशिवाय कोणताही लढा यशस्वी होऊ शकत नाही यामुळे सर्वांनी मिळून या लढ्यासाठी आपण तयार व्हावे असे मत व्यक्त केले लोकशाही धडक मोर्चा ची अध्यक्ष शेखर पगार यांनी नारपार ही संकल्पना भाऊसाहेब हिरे यांच्या काळापासून सुरू असून या योजनेसाठी प्रशांत हिरे यांच्यासह इतर नेत्यांनी प्रयत्न केले मात्र नांदगाव तालुक्यातील स्वार्थी नेत्यांमुळे आजवर ही योजना मार्गी लागली नाही याउलट नारपार नदीवर प्रकल्पातून नांदगाव तालुक्याला वगळण्यात आल्या मुळे भविष्यात आपल्याला केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी मोठा जन लढा उभारून रेल रोको करावे लागेल यासाठी सर्वांनी सहभाग घेणे गरजेचे आहे फिरोज शेख यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चवदार तळ्याचा संदर्भ देतो तेव्हाही मुस्लिम बांधव पाण्याच्या सत्याग्रहासाठी सोबत होती व आताही नांदगाव तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधव सोबत असतील नारपात जिल्हा समिती जो निर्णय घेईल त्या निर्णयाशी सहमत असून या लढ्यात मुस्लिम समाज खांद्याला खांदा लावून उतरेल असे मत व्यक्त केले यावेळी प्रस्तावना अप्पा परदेशी यांनी केली तर भीमराज जेजुरे प्रा विनोद आहिरे शेखर पगार पी आर निळे रमेश कराड बाळासाहेब साळुंखे प्रवीण पगारे संगिता सोनवणे आम्रपाली निकम युनुस पठाण विजय पाटील हरेश्वर सुर्वे अशोक लहिरे दीपक गोगड गंगाधर बिडगर भीमराज लोखंडे आदींची भाषणे झाली यावेळी माजी आमदार जगन्नाथ धात्रक,विनोद शेलार,पिंटू नाईक,रवींद्र घोडेसवार,संतोष अहिरे,संतोष बळीद,संगीता सोनवणे,आम्रपाली निकम,दिलीप नरवडे, फिरोज शेख,दीपक गोगड,बाळासाहेब साळूंखे,रमेश कराड,सुधीर पाटील, गंगाधर बिडगर,शेखर पगार सजनतात्या कवडे संजय भालेराव दीपक धिवर आदिसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
नारपारसाठी गेल्या अनेक वर्षा पासून संघर्ष केला जात आहे मात्र त्याची दखल घेण्यात आली त्यामुळे आता जोरदार लढा देण्याची वेळ आली असून जो पर्यत नारपारचे पाणी मिळत नाही तो पर्यत लढा सुरु ठेवण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला शिवाय नारपार प्रकल्पात नांदगाव तालुक्याचा समावेश करण्यात यावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.अगोदर मांजर पाड्यातून नांदगावं तालुक्याला वगळून अन्याय करण्यात आला आता नारपार मध्ये ही नांदगावं तालुक्याचा समावेश न करून नांदगावं तालुक्याच्या जनतेवर एका प्रकारे अन्याय करण्यात आला आहे.लवकरच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे त्यामुळे त्या अगोदर नारपार सोबत मांजर पाड्याचे पाणी मिळविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे काही वक्त्यांनी सांगितले.
करंजवण सारखे श्रेय लाटणाऱ्यांना यापासून दूर ठेवा
मनमाड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी करंजवन ते मनमाड थेट पाईपलाईन योजना करण्यात आली ही योजना मुळात मनमाड नगरपालिकेची तत्कालीन नगराध्यक्ष पद्मावती धात्रक यांच्यासह नगरपालिकेतील सर्व पक्षीय नगरसेवक शहरातील सामाजिक कार्यकर्ते सर्व पत्रकार बांधव यास मनमाड बचाव कृती समिती तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्यासह अनेक अदृश्य शक्तींनी ही योजना पूर्ण करण्यासाठी मदत केली मात्र या योजनेचे दुसरेच लाटून घेत आहे यामुळे नारपार जल हक्क समितीच्या सर्व सदस्यांना विनंती करतो की जे लोक श्रेय लाटण्यासाठी सोबत येथील अशा लोकांना या लढ्यापासून दूर ठेवा
पी.आर .निळे रिपाई ज्येष्ठ नेते