आषाढी एकादशी विशेष रेसिपी

आषाढी एकादशी विशेष

चविष्ट भगर ढोकळे

साहित्य :
1 वाटी दही, 100 ग्रॅम शिंगाडा पीठ, 200 ग्रॅम भगर, 100 ग्रॅम राजगिरा पीठ, जिरे, सेंधव मीठ, सोडा, बारीक चिरलेली कोथिंबीर, तळण्यासाठी शेंगदाण्याचे तेल.
कृती –
सर्वप्रथम भगर 2 तास भिजत ठेवा.दही फेणून राजगिरा आणि शिंगाडा पीठ मिसळा. भगर वाटून सर्व जिन्नस एकत्र करून तयार करावे. यामध्ये एक चमचा सोडा आणि मीठ घालून फेणून घ्या. हे मिश्रण कुकरच्या डब्यात भरून एक शिट्टी द्या.
आता हे मिश्रण थंड होऊ द्या. थंड झाल्यावर त्याचे तुकडे करा. एका पॅनमध्ये तेल तापत ठेवा आणि त्यामध्ये जिरे घाला आणि ही फोडणी ढोकळ्यावर घाला. वरून कोथिंबीर घालून दह्यासह सर्व करा.

 


ऍपल रबडी
साहित्य : गोड जातीची सफरचंदे, लहान असतील तर दोन आणि मोठे असेल तर 1. लिंबाचा रस 4/5 थेंब किंवा चिमूटभर सायट्रिक ऍसिड, आवडत असेल तर चिमूटभर दालचिनी पावडर ( किंवा आवडता स्वाद ) 1 टिस्पून बारीक केलेले अगर अगर एक कप भरून मिल्क पावडर, 1 टिस्पून साखर, 1 टिस्पून साजूक तूप.
कृती : एका पातेल्यात पाव कप पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस किंवा सायट्रिक ऍसिड आणि दालचिनी पूड एकत्र करा. – सफरचंदाचा मधलाच गोलाकार भाग कापून वेगळा करा. आता हे मिश्रण सतत ढवळत रहा. करकरीत सफरचंदे असतील तर मिश्रण शिजायला वेळ लागेल. पिठूळ असतील तर लगेच शिजतील. पाणी आटले की आच बंद करा. साखर या मिश्रणातच घालून शिजवा. एका जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कढईत 1 टिस्पून साखर टाका आणि मंद आचेवर ठेवा. साखर सोनेरी होऊ लागेल. त्यात अर्धा कप पाणी टाका. त्यात साजूक तूप टाका. पाण्याला उकळी आली की, त्यात मिल्क पावडर टाका आणि डावेने भराभर ढवळा. आच बंद करून त्यात सफरचंदाचे मिश्रण टाका आणि गरज वाटली तर हँड मिक्सरने ब्लेंड करा.

 

हे ही वाचा :पैठणी : महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव

मायलेकीच्या आत्महत्येचे गूढ उकलले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *