पालकांनो धीर धरा..!

शुभांगी महाजन

जून महिना उजाडला. नवीन शैक्षणिक वर्षात शाळेची लगबग सुरू झाली. परंतु, मधील काळात झालेल्या बदलानुसार विद्यार्थ्यांसाठी सर्व काही नवे आहे. वर्ग नवा..अभ्यास नवा. शिक्षक नवे. पुन्हा शिक्षणपद्धती ऑफलाइन.म्हणजेच विद्यार्थ्यांना मागे सुटलेल्या मार्गांवर पुन्हा चालायचे आहे. पुन्हा नवीन वाटा शोधायच्या. पुन्हा नवीन वेगाने ठरलेल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना प्रयत्नशील व्हायचे आहे. मात्र, याची जाणीव प्रत्येक विद्यार्थ्याला असेलच असे नाही. कारण त्यांची मानसिकता बौद्धिक क्षमता, बौद्धिक पातळी ही समान नसेल म्हणून त्याच गतीने ते मार्गस्थ होतील. यामध्ये विद्यार्थ्यांना मात्र त्याची जाणीव करून देणेही तितकेच गरजेचे…

पैठणी : महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव

गेल्या वर्षात झालेले शैक्षणिक नुकसान हे न भरून निघणारे असले तरी सकारात्मक विचार समोर ठेवून पुन्हा नवीन उभारी ही निर्माण करावीच लागेल. त्यासाठी नवी जाणीव…नवे स्वप्न.. मरगळलेल्या मनात नवे चैतन्य फुलवून.. भरकटलेल्या वाटेवर योग्य दिशा दाखवण्याचे काम शिक्षक, पालक यांना जबाबदारीने पार पाडायचे आहे….काही अपेक्षा विद्यार्थ्यांकडून पालकांना असतील पण त्यांना थोडा वेळ द्या थोडी संधी द्या. त्यांची बाजू समजून मग त्या अपेक्षा हळुवारपणे पूर्ण करा म्हणून पालकांनो जरा धीर धरा आणि मुलांची बाजू पडताळा त्यासाठी प्रयत्नशील व आशावादी राहणे हे महत्त्वाचे….क्युकी सब्र का फल मीठा होता है…कड़वा नहीं…..

हे ही वाचा :

नाशिकरोडला महिलेचा मृतदेह आढळला

अनैतिक संबंधातून प्राणघातक हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *