सिडको : दिलीपराज सोनार
नाशिकमधील ठाकरे गटाच्या नेत्याच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा कोकणे यांच्या घराबाहेर उभा असणाऱ्या गाडीवर अज्ञातांनी रात्री हल्ला केला. यापुर्वीही अशाच पद्धतीने बाळा कोकणे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता दरम्यान हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला की अन्य कारणावरुन झाला यादिशेने पोलिसांचे तपासचक्र सुरु झाले आहेत
याबाबत थोडक्यात माहिती अशी की शिवसेना उबाठा गटाचे मध्य विधानसभा अध्यक्ष बाळा कोकणे हे पंचवटीतील हनुमान नगर परिसरात रहात आहेत रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास बाळा दराडे यांनी आपल्या इमारतीच्या पार्किंग मध्ये पार्किंग केलेल्या चारचाकी वाहनावर अज्ञात समाजकंटकांनी भला मोठा दगड टाकुन वाहनाचे नुकसान करत दहशत करण्याचा प्रयत्न केला दरम्यान बाळा कोकणे सकाळी दुध घेण्यासाठी बाहेर आले असता त्यांना सदरील प्रकार घडला त्यानंतर त्यांनी सोसायटीतील रहिवाशांना या बाबतची माहिती देत असतांना रात्रीच्या सुमारास आवाज आल्याचे काहींनी सांगितले त्यानंतर बाळा कोकणे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे
बाळा कोकणे यांच्यावर यापुर्वीही असाच जीवघेणा हल्ला केला होता उबाठा गटाचे पदाधिकारी कोकणे यांच्या गाडीवर हल्ला करणारे कोण आहेत? त्यांचा उद्देश काय आहे? राजकिय वैमनस्यातून किंवा अन्य कारणावरुन हा हल्ला झाला आहे का? असे एक ना अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे
कांदा उत्पादक शेतकर्यांची मागणी लासलगाव : वार्ताहर कांद्याच्या बाजारभावात होणारी घसरण लक्षात घेता गुजरात सरकारने…
मंत्री छगन भुजबळ यांच्या मागणीला यश; केंद्राकडून मंजुरी नाशिक : प्रतिनिधी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा…
नाशिक : प्रतिनिधी पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरेंच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या पदाधिकार्यांकडून सिडको परिसरात विविध…
वावी पोलिसांची कामगिरी; तीन दुचाकी हस्तगत सिन्नर ः प्रतिनिधी वावी येथून मोटारसायकल चोरून नेणार्या चोरट्याला…
पेठ फाटा येथे कारवाई; एक जण अटकेत सिडको : विशेष प्रतिनिधी बंदी असलेला सुगंधित गुटखा,…
भोर टाउनशिपजवळ खड्ड्यात बुडणाऱ्या चौघांपैकी एका मुलाचा मृत्यू सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर-अंबड लिंकरोडवरील भोर…